Sugandha Mishra And Dr Sanket Bhosle Bless With Baby Girl Instagram
मनोरंजन बातम्या

Sugandha Mishra: ‘कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म, Video शेअर करत अभिनेत्रीच्या पतीने दिली गोड बातमी

Sugandha- Sanket Welcome Baby Girl: ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री सुगंधा शर्माने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

Chetan Bodke

Sugandha Mishra And Dr Sanket Bhosle Bless With Baby Girl

‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री सुगंधा शर्माने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबद्दलची माहिती सुगंधाचे पती आणि डॉ.संकेत भोसले यांनी नुकतीच गुड न्युज दिली आहे. तिच्या पतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या पतीने हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, संकेत, सुगंधा शर्मा आणि छोटी राजकुमारीही त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सुगंधाच्या पतीने व्हिडीओ शेअर करताना मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. हॉस्पिटमधल्या व्हिडीओमध्ये सुगंधाचा पती संकेत म्हणतो, “आजची मोठी बातमी आहे की, मी बाबा झालो आहे आणि सुगंधा आई झाली आहे.” असं म्हणत संकेतने व्हिडीओमध्ये लेकीची झलकही दाखवली आहे.

व्हिडीओ शेअर करताना संकेतने कॅप्शन दिले की, ‘निसर्गाने आम्हाला सर्वात जादुई आशिर्वाद दिला आहे. आमच्या प्रेमाचं प्रतीक, आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच कायम राहू देत.’ (Social Media)

अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि तिचा पती डॉ. संकेत भोसले यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये सोशल मीडियावर गुड न्यूज शेअर केली होती. ‘द कपिल शर्मा शो’ फेम अभिनेत्री सुगंधाने वयाच्या ३५ व्या वर्षी मुलीला जन्म दिला आहे. सुगंधाच्या पतीने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

भारती सिंह म्हणते, 'अभिनंदन. याहू, बेबी गर्ल. जय माता दी...' तर तब्बूने टाळ्या वाजवल्याचे सिम्बॉल शेअर केला आहे. तर सुनील ग्रोव्हर म्हणतो, 'अभिनंदन. आई बाबांना. गोंडस मुलीला आशिर्वाद.' रिद्धिमा पंडित, रुस्लान मुमताज आणि हितेन तेजवानी यांनीही सुगंधा संकेतचे अभिनंदन केले. (Actress)

सुगंधा आणि संकेत यांनी लग्नाआधी अनेक वर्ष एकमेकांना एकत्र डेट केलं होतं. त्यानंतर २६ एप्रिल २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर ते आई-बाबा होणार आहेत. सुगंधाचा पती पेशाने डॉक्टर आणि कॉमेडियन आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT