मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याला काल रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. शूटिंगवरून घरी परतताच तो बेशुद्ध पडला. पत्नी दीप्तीने त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आलीय. श्रेयसच्या प्रकृतीबाबत आता दीप्ती अधिक माहिती दिलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत दिप्तीने म्हटलंय की, माझ्या पतीची तब्येत खालावल्याचे समजताच मित्र परिवारासह चाहत्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच क्षेयसला लवकर बरं होण्यासाठी आशिर्वाद दिले. या सर्वांचे मी आभार मानते. आता श्रेयसची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांतच त्याला डिस्चार्ज दिला जाईल, असं दीप्तीने यात म्हटलंय.
काल श्रेयसची प्रकृती बिघडल्यावर डॉक्टरांचे (Doctor) मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी तात्काळ उपचार सुरू केले. त्यांच्या कामाचेही मी आभार मानते. तसेच पत्रकारांसह चाहत्यांनी आमच्या गोपनीयतेचा आदर ठेवावा, असंही दिप्तीने या पोस्टमध्ये म्हटलंय.
श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शुटींग करत होता. तो सेटवर सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून खेळून बोलत होता. त्याने दिवसभर शुटींग देखील केले आणि तो पूर्णपणे ठीक होता. त्याने काही अॅक्शन सीनदेखील शूट केले. शूटिंगसंपवून तो घरी पोहोचला होता. घरी पोहचताच त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याचा हा त्रास हळूहळू जास्त वाढू लागला.त्रास सुरू झाल्याने त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.