Bharti Singh-Haarsh Limbachiyaa Case: कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. एनसीबीने भारती- हर्षला मिळालेला जामीन रद्द करण्याची याचिका विशेष न्यायालयात दाखल केली होती. पण या दोघांनी ही जामिनाच्या कोणत्याही अटींचे उल्लंघन केले नसून विशेष NDPS न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची याचिका फेटाळली आहे.
काही एनसीबी अधिकाऱ्यांना भारती आणि हर्षच्या घरी अंमली पदार्थ मिळाले होते. त्या दोघांनाहाी नोव्हेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. NCB ने युक्तिवाद केल्या प्रमाणे, त्यांच्या वकिलांचे मत न ऐकताच जामीन मंजूर करण्यात आला होता, पण न्यायालयाने माहिती दिल्याप्रमाणे, एजन्सी सुनावणीला उपस्थित न राहिल्याने ही त्यांची चूक आहे, जामीन रद्द करण्याचे कोणतेही कारण नाही.
विशेष NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) न्यायालयाने गेल्या आठवड्यात एनसीबीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे, दाखल केलेल्या याचिकेत अभिनेत्री आणि तिच्या पतीला देण्यात आलेला जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
विशेष न्यायालयाने म्हटले की, २२ नोव्हेंबर २०२० रोजी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी NCB ला न्यायालयात बोलावण्यात आले होते, पण एजन्सीच्या वतीने न्यायालयात कोणीही हजर झाले नाही. त्यानंतर २३ नोव्हेंबरला न्यायालयात फिर्यादी किंवा तपास अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे एजन्सीची चुक असल्याने भारती आणि हर्षचा जामिन नामंजुर करण्याचा कोणतेही कारण नाही असं सांगण्यात आले. (Entertainment News)
नेमकं काय आहे प्रकरण...
NCB ने २१ नोव्हेंबर २०२० रोजी भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया यांनी घरी आणि ऑफिसमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दुसऱ्या दिवशी अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.