Kalki 2898 AD चा बॉक्स ऑफिसवर धमाका; दोन दिवसातच पार केला १०० कोटींचा टप्पा
Kalki 2898 AD Instagram
मनोरंजन बातम्या

Kalki 2898 AD चा बॉक्स ऑफिसवर धमाका; दोन दिवसातच पार केला १०० कोटींचा टप्पा

Chetan Bodke

२०२४ चा बहुप्रतिक्षित आणि बिगबजेट चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) गुरुवारी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दुल्कर सलमान, कमल हसन अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूडसह टॉलिवूडमधील अनेक स्टारकास्ट आहेत. प्रेक्षक, सेलिब्रिटी आणि समीक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे, जाणून घेऊया चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल....

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ हा सायन्स फिक्शन चित्रपट गुरुवारी (२७ जून) थिएटरमध्ये रिलीज झाला. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ एवढी होती की पहिल्या आणि दुसऱ्या दिवसासाठी जबरदस्त प्री-बुकिंग झाली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दोन दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमावला आहे. तर जगभरामध्ये चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ५४ कोटींची कमाई केलेली आहे. यापैकी तेलुगूमध्ये २६.६५ कोटी, हिंदी भाषेत २२.५ कोटी, मल्याळम २ कोटी, तमिळ ३.५ कोटी आणि कन्नड भाषेत ३५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

साय फाय आणि फ्युचरिस्टिक चित्रपटाच्या कमाईमुळे बॉक्स ऑफिसचा दुष्काळ संपला आहे, असं म्हटलं जात आहे. दोन दिवस वीकेंड असल्याने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट किती कमाई करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झालेला आहे. ६०० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना AI टेक्नोलॉजी, ग्राफिक्स, ॲनिमेशन सारखे टुल्स वापरण्यात आलेले आहे. आगामी भविष्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे चाहते कौतुक करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT