Jitendra Kumar On Panchayat 3 Fees Saam TV
मनोरंजन बातम्या

Jitendra Kumar's Panchayat Fees: 'पंचायत ३'मधील सचिवजी ठरला सर्वाधिक फी घेणारा सेलिब्रिटी, मानधनाच्या बातम्यांवरून भडकला जितेंद्र कुमार

Panchayat 3 Actors Fees: नुकतीच 'पंचायत ३' वेबसीरीज 'प्राईम व्हिडीओ'वर रिलीज झाली आहे. या सीरीजसाठी जितेंद्र कुमारने किती मानधन घेतले? याचे अनेक माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले. अशातच जितेंद्रने आपल्या पगाराबद्दल भाष्य केले.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता जितेंद्र कुमार सध्या 'पंचायत ३' आणि 'कोटा फॅक्टरी ३' मुळे बराच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्रची 'पंचायत ३' वेबसीरीज 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ'वर रिलीज झालेली आहे. या सीरीजसाठी जितेंद्र कुमारने किती मानधन घेतले ? याबद्दलचे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केले. जितेंद्र कुमारने 'पंचायत ३' वेबसीरीजसाठी चांगलेच घसघशीत मानधन घेतले आहे. अशातच अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे, त्यामध्ये जितेंद्रने कोणाच्याही पगाराविषयी चर्चा करणं खूप चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

नुकतंच जितेंद्र कुमारने आपल्या मानधनाबद्दल चाललेल्या चर्चांविषयी भाष्य केले की, "मला वाटतं की, कोणाच्याही पगाराविषयी आणि आर्थिक परिस्थितीविषयी चर्चा करणं खूप चुकीचं आहे. अशा चर्चांवरून कोणतीही गोष्ट मिळत नाही. त्या फक्त चर्चाच असतात. त्यामुळे मला वाटतं की कोणीही अशाप्रकारच्या अफवांमध्ये पडू नये. अशा कोणत्याही चर्चा व्हायला नकोत."

अभिनेता जितेंद्र कुमारने 'पंचायत' सीरीजमध्ये सचिव जी अभिषेक त्रिपाठीचे पात्र साकारले आहे. त्याने या वेबसीरीजसाठी एका एपिसोडसाठी ७०,००० रुपये इतके मानधन स्वीकारले आहे. एका सीझनसाठी त्याने ५ लाख ६० रुपये इतके मानधन स्वीकारले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नीना गुप्ता 'पंचायत ३'मधील दुसरी हायेस्ट पेड ॲक्टर आहे. तिने या सीरीजसाठी ५०,००० रुपये मानधन घेतले.

'पंचायत ३' हिट झाल्यानंतर आता जितेंद्र कुमार 'कोटा फॅक्टरी ३'च्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्याची ही सीरिज २० जून रोजी 'नेटफ्लिक्स'वर रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT