Kalki 2989 AD : 'कल्की २८९८ एडी'साठी प्रभास, दीपिकासह बिग बींनी किती घेतलं मानधन? जाणून घ्या...

Kalki 2989 AD Star Cast Fees : 'कल्की २८९८ एडी' साय- फाय आणि पीरियोडिक ड्रामा चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बिग बी बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन, नाग आश्विन, दिशा पाटनी आहेत.
Kalki 2989 AD : 'कल्की २८९८ एडी'साठी प्रभास, दीपिकासह बिग बींनी किती घेतलं मानधन? जाणून घ्या...
Kalki 2989 AD Star Cast FeesSaam Tv

बहुप्रतिक्षित 'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD)चा ट्रेलर रिलीज होताच चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलरला एका दिवसांतच ३२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेला आहे. 'कल्की २८९८ एडी' या साय- फाय आणि पीरियोडिक ड्रामा असलेल्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बिग बी बच्चन, प्रभास, दीपिका पादुकोण, कमल हसन, नाग आश्विन, दिशा पाटनी सह अनेक ताकदीचे कलाकार आहेत. या चित्रपटातील कलाकारांनी कोटींमध्ये मानधन स्वीकारले आहे.

Kalki 2989 AD : 'कल्की २८९८ एडी'साठी प्रभास, दीपिकासह बिग बींनी किती घेतलं मानधन? जाणून घ्या...
Sonakshi And Zaheer Register Marriage : सोनाक्षी- जहीर लग्नात सप्तपदी घेणार नाहीत ?, अभिनेत्रीच्या बेस्ट फ्रेंडने सांगितलं कसं होणार लग्न

नाग आश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचं एकूण बजेट ६०० कोटींचे आहे. उत्तम कथानक आणि दमदार व्हिएफएक्स असलेल्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. मिळालेल्या माहितीनुसार निर्मात्यांनी व्हिएफएक्सवर आणि आधुनिक तंत्रज्ञानावरच सर्वाधिक पैसे खर्च केले आहेत. 'कल्की २८९८ एडी' चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटासाठी प्रभासने १५० कोटी रुपये इतके मानधन स्वीकारले आहे.

'कल्की २८९८ एडी'मध्ये दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पण तरीही त्या मानाने दीपिकाची फी प्रभासच्या तुलनेत खूपच कमी आहे. दीपिकाने 'कल्की 2898 एडी'या चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटासाठी तिने आपल्या मानधनात वाढ केली आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'कल्की 2898 एडी' चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी १८ कोटी रुपये आकारले असल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटामध्ये कमल हसन यांचीही प्रमुख भूमिका आहे. कमल हसन यांनी या चित्रपटासाठी २० कोटी रुपये फी घेतली आहे. तर दिशा पटानीने चित्रपटासाठी फक्त २ कोटी रुपये फी घेतली आहे.

Kalki 2989 AD : 'कल्की २८९८ एडी'साठी प्रभास, दीपिकासह बिग बींनी किती घेतलं मानधन? जाणून घ्या...
Kartik Aaryan Fees : कार्तिक आर्यन फीसमध्ये मोठी घट करण्याच्या तयारीत, नेमकं कारण काय ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com