Kalki 2898 AD Teaser : 'कल्की'चा नवा टीझर रिलीज, चित्रपटात दिसणार धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया

Introducing Bujji Kalki 2898 AD Film : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज झालेला आहे.
Kalki 2898 AD Teaser : 'कल्की'चा नवा टीझर रिलीज, चित्रपटात दिसणार धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया
Introducing Bujji Character Kalki 2898 AD FilmSaam Tv

नाग अश्विन दिग्दर्शित (Director Nag Ashwin) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात प्रभास (Prabhas), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone), कमल हासन (Kamal Haasan) आणि दिशा पटानी (Disha Patani) सह अनेक दिग्गज सेलिब्रिटी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी या बिग बजेट चित्रपटाची रिलीज डेट बदलली होती, त्यामुळे चाहते नाराज झाले होते. अशातच आता निर्मात्यांकडून चित्रपटाचा नवा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे. या टीझरमध्ये निर्मात्यांनी 'बुज्जी' नावाच्या कॅरेक्टरची ओळख करुन दिलेली आहे.

Kalki 2898 AD Teaser : 'कल्की'चा नवा टीझर रिलीज, चित्रपटात दिसणार धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया
Shah Rukh Khan Discharged : किंग खान इज बॅक, शाहरूख खानच्या सुधारणा; फायनल पाहण्यासाठी मैदानात येणार का ?

'कल्की 2898 एडी' हा मोस्ट अवेटेड चित्रपट येत्या २७ जून २०२४ ला रिलीज होणार आहे. नुकताच चित्रपटाचा एक टीझर रिलीज करण्यात आलेला आहे. या टीझरमध्ये, 'बुज्जी' नावाच्या रोबोटची ओळख चाहत्यांना करून दिलेली आहे. हा रोबोट भैरवचा सोबती दाखवलेला आहे. हा रोबोट भैरवच्या म्हणण्याप्रमाणे काम करत असतो. या टीझरमध्ये प्रेक्षकांना धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया पाहायला मिळेल. अवघ्या काही सेकंदाच्या ह्या टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

बुज्जी आणि भैरवची मैत्री नेटकऱ्यांना प्रचंड भावली असून चाहते सध्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ह्या बिगबजेट चित्रपटाची निर्मिती ६०० कोटींच्या आसपास केलेली आहे. हा मेगाबजेट चित्रपट मे २०२४ मध्ये रिलीज होणार होता. पण निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे.

Kalki 2898 AD Teaser : 'कल्की'चा नवा टीझर रिलीज, चित्रपटात दिसणार धमाकेदार ॲक्शन आणि AI ची किमया
Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com