Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण

Manoj Bajpayee And Anurag Kashyap News : आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता म्हणजे मनोज बाजपेयी. त्याने आपल्या सिनेकरियरमध्ये चाहत्यांना अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत.
Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण
Manoj Bajpayee And Anurag Kashyap NewsSaam Tv

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा अभिनेता म्हणजे मनोज बाजपेयी. त्याने आपल्या सिनेकरियरमध्ये चाहत्यांना अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. 'सत्या', 'शुल' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या चित्रपटामुळे अभिनेत्याच्या प्रसिद्धीत बरीच वाढ झाली.

अनुराग कश्यपने मनोज बाजपेयीच्या 'सत्या' आणि 'शूल' या चित्रपटाची कथा लिहिली होती. तर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. पण अनुराग कश्यपने मनोज बाजपेयींसोबत ११ वर्षे एकही चित्रपट केला नाही. त्याचं कारण आता खुद्द मनोज बाजपेयीने एका मुलाखतीतून सांगितले आहे.

Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण
Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयीने अनुराग कश्यपसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. मुलाखतीत मनोज बाजपेयीने सांगितले की, " आमच्या दोघांमध्येही एका गोष्टीमुळे गैरसमज झाला होता. पण आम्ही त्यावर कधीही बोललो नाही. त्या गोष्टीची सोशल मीडियावर खूप खूप चर्चा होत असते. पण त्या गोष्टीचा कधी विचार केला तरी मला लाज वाटते. आमच्या फ्रेंडशिपवर ट्रोलर्स खूप खिल्ली उडवतात. तो माझ्याप्रमाणे चित्रपट बनवत नसल्यामुळे आम्ही एकमेकांसोबत बोलत नव्हतो."

Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण
Aishwarya Thackeray : ठाकरेंचं 'ऐश्वर्य' आता बॉलिवूडमध्ये; ठाकरेंची पुढची पिढी दिसणार सिल्व्हर स्क्रीनवर

"माझी अनुरागला कोणतीही गरज नव्हती, कारण माझ्या करियरला उतरती कळा लागल्यामुळे तो माझ्यासोबत बोलत नव्हता. म्हणून आम्ही दोघे आपआपल्या आयुष्यात आनंदी होतो. दोघांनाही आपआपल्या आयुष्यात एकमेकांची गरज नव्हती." मनोज बाजपेयी आणि अनुराग कश्यपने १९९८ मध्ये 'सत्या' चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. याचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते, तर अनुराग कश्यपने स्टोरी लिहिली होती.

Manoj Bajpayee News : 'सत्या' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' एकत्र गाजवला, १२ वर्षे अनुराग कश्यपसोबत एकही चित्रपट नाही; मनोज वाजपेयीने सांगितलं कारण
Shah Rukh Khan: शाहरुख खानची प्रकृती बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल

'सत्या' सुपरहिट ठरल्यानंतर त्या दोघांनीही 'शूल'मध्ये एकत्र काम केले होते. मात्र यानंतर दोघांनीही ११ वर्षे एकत्र काम केले नाही. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात मनोज बाजपेयी आणि अनुराग कश्यप यांना एकत्र काम केले होते. पण त्या चित्रपटापासून आजपर्यंत म्हणजे १२ वर्षांनंतर दोघांनीही एकत्र काम केलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com