Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य

Akshay Kumar On Son Aarav Kumar : अभिनेता अक्षय कुमारने नुकतंच एका टॉक शोमध्ये मुलगा आरवबद्दल भाष्य केले आहे. मुलाखतीत अभिनेत्याने मुलाच्या सवयींबद्दल भाष्य केलं आहे.
Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य
Akshay Kumar On Son Aarav KumarSaam Tv
Published On

बॉलिवूडचा खिलाडी म्हणून अक्षय कुमारची सर्वत्र ओळख आहे. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची विशेष ओळख प्रस्थापित केली आहे. अभिनेता अनेकदा त्याच्या सिनेकरियरवर भाष्य करत असतो. पण केव्हाही त्याने आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल भाष्य केले नाही. अशातच अभिनेत्याने एका टॉक शोमध्ये आपल्या मुलाबद्दल भाष्य केले आहे. या मुलाखतीत अभिनेत्याने मुलगा आरव याच्या सवयींबद्दल भाष्य केलं आहे.

Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य
Aishwarya Thackeray : ठाकरेंचं 'ऐश्वर्य' आता बॉलिवूडमध्ये; ठाकरेंची पुढची पिढी दिसणार सिल्व्हर स्क्रीनवर

नुकतंच अभिनेता अक्षय कुमार ह्याने क्रिकेटर शिखर धवनच्या टॉक शोमध्ये आपल्या मुलाच्या आयुष्यातील पैलू उलगडले आहेत. अभिनेता मुलाखतीत म्हणाला की, “आरवने वयाच्या १५ व्या वर्षी घर सोडून परदेशात शिक्षणासाठी जावं, असं मला नव्हतं वाटत. सध्या माझा मुलगा लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. त्याने वयाच्या १५ व्या वर्षीच घर सोडलं होतं. त्याला अभ्यासाची फार आवड असून त्याला एकटं राहायला आवडायचं. परदेशात शिकायला जायचा निर्णय त्याने स्वत: घेतला होता. पण त्याने परदेशात शिक्षणासाठी जावं असं मला केव्हाच वाटत नव्हतं. ”

मुलाखतीत अक्षय पुढे म्हणाला, “खरंतर, मी स्वत: त्याला रोखू शकलो नव्हतो, कारण मीच वयाच्या १४ व्या वर्षी घर सोडलं होतं.” मुलाखतीमध्ये अक्षयने मुलाच्या सवयींवरही भाष्य केलं. तो म्हणाला, “तो स्वत: त्याचे कपडे त्याच्या हाताने धुतो. सोबतच जेवणही तो खूप स्वादिष्ट बनवतो. स्वत:ची भांडी स्वत: धुतो. त्यासोबतच तो महागड्या कपड्यांचा शौक नाही. तो केव्हाही महागडे कपडे खरेदी करीत नाही. कपडे खरेदी करण्यासाठी आरव सेकंड हँड स्टोअर किंवा थ्रिफ्टी मध्ये जातो. त्याला कपड्यांवर पैसे वाया घालवायला आवडत नाही..”

Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य
Shah Rukh Khan: शाहरुख खानची प्रकृती बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल

मुलाखतीच्या शेवटच्या भागात अक्षय कुमार म्हणाला की, “आरवला इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणं खूप सोपे होईल. कारण त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा फिल्म इंडस्ट्रीतील एक भाग आहेत. असं असलं तरीही माझ्या मुलाला अभिनयात रस नाही. आम्ही त्याच्यावर कधीही जबरदस्ती केली नाही. त्याला फॅशनमध्ये आवड आहे, पण अभिनयात त्याला आवड नाही. एकदा आरव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला चित्रपटांत काम करायचं नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो, तुझं आयुष्य आहे तुला जे करायचं आहे ते कर…”

Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य
Premachi Goshta Serial: 'तू स्वतः कधीच आई होऊ शकत नाही...' आदित्य घर सोडून गेल्यावर सावनीने मुक्ताला सुनावले

मुलगा आरवला साधं सिंपल ठेवण्यामागे पत्नी ट्विंकलची मेहनत असल्याचे अक्षयने मुलाखतीत सांगितले होते. यावेळी अक्षयने ट्विंकलचे कौतुकही केले. अक्षय म्हणाला, “ट्विंकल आणि मी ज्याप्रकारे आरवचं पालनपोषण केलं आहे त्यावर मी खूश आहे, तो खूप साधा मुलगा आहे. मुलगी नितारालाही फॅशनची खूप आवड आहे. ती सध्या १२ वर्षांची आहे. ”

Akshay Kumar Son Aarav Kumar : अक्षय कुमारच्या लेकांनं वयाच्या १५ व्या वर्षीच सोडलं घर, थक्क करणाऱ्या सवयींवर अभिनेत्याने केले भाष्य
Vanita Kharat Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा 'तुरु तुरु चालू नको' गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com