Vanita Kharat Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा 'तुरु तुरु चालू नको' गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Vanita Kharat Dance Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात नेहमीच चर्चेत असते. वनिता खरात आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकत असते.वनिताने नुकतीच एका डान्सची रिल पोस्ट केली आहे. ही रिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Vanita Kharat Dance Video
Vanita Kharat Dance VideoSaam Tv

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात नेहमीच चर्चेत असते. वनिता खरात आपल्या कॉमेडीच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांची मने जिंकत असते. हास्यजत्रेचा संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. वनिता खरात ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी डान्सचे, कॉमेडीचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. वनिताने नुकतीच एका डान्सची रिल पोस्ट केली आहे. ही रिल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वनिताने प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर प्रथमेश परबसोबत जबरदस्त डान्स केला आहे. वनिताने तुरु-तुरु चालू नको या गाण्यावर खूप मस्त रिल बनवली आहे. वनिता आमि प्रथमेशने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. प्रचंड एनर्जी आणि उत्तम स्टेप्स करत त्यांनी नेटकऱ्यांनी मने जिंकली आहेत. वनिताने फुल एनर्जीने हा डान्स केला आहे. डान्सच्या शेवटी तर वनिता प्रथमेशला उचलून घेते. हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vanita Kharat Dance Video
Vicky Kaushal-Katrina Kaif: विकी- कतरिनाच्या घरी नवा पाहुणा येणार? लंडनमधील त्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

या व्हिडिओवर हास्यजत्रेची पोरगी नाचायला लागली तुरु तरु असं कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच इतर कलाकारांनी कमेंट्स केल्या आहे. सर्वांनी वनिता खरातचे खूप कौतुक केले आहे. वनिताचा डान्स परफॉर्मन्स हा शिवाली परब, नम्रता, इशा डे सर्वांनाच आवडला आहे.

वनिता खरात सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात काम करत आहे. वनिताने कबीर सिंग या चित्रपटातदेखील काम केले आहे. वनिताने प्रसाद खांडकेकर, नम्रता संभेरावसोबत एकदा येऊन तर बघा या चित्रपटात काम केले होते.

Vanita Kharat Dance Video
Mukta Barve: '...त्याच्याशीच मी लग्न करेन'; मुक्ता बर्वेची मिस्टर परफेक्टसाठी स्पेशल अट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com