Mitchell Starc: मिचेल स्टार्कला याच दिवसासाठी KKR ने २४.७५ कोटी मोजले; हा व्हिडिओ कितीही वेळा बघा, नजर हटणारच नाही!

Mitchell Starc Clean Bowled Travis Head: स्टार्क काय करु शकतो हे गंभीरला चांगलच माहित होतं. मोक्याच्या क्षणी त्याने संघासाठी शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
Mitchell Starc: मिचेल स्टार्कला याच दिवसासाठी KKR ने २४.७५ कोटी मोजले; हा व्हिडिओ कितीही वेळा बघा, नजर हटणारच नाही!
Mitchell Starc proved gautam gambhir right Clean Bowled Travis Head in crucial game watch video amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता. कोलकाता नाईट रायडर्सने माजी खेळाडू गैातम गंभीरची मेन्टॉर म्हणून निवड केली. त्याने लिलावात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वर्ल्डकप विजेत्या ऑस्ट्रेलिया संघातील गोलंदाज मिचेल स्टार्कवर त्याने विक्रमी २४.७५ कोटींची बोली लावली. या गोलंदाजाला आपल्या संघात स्थान देण्यासाठी सर्वच संघांनी जोर लावला.

मात्र गंभीरने काही माघार घेतली नाही. त्याने शेवटपर्यंत किल्ला लढवला आणि २४.७५ कोटींची विक्रमी बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिलं. तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला. स्टार्क काय करु शकतो हे गंभीरला चांगलच माहित होतं. मोक्याच्या क्षणी त्याने संघासाठी शानदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.

हेडची उडवली दांडी

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबा हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्कने हैदराबादच्या फलंदाजी आक्रमणाचं कंबरडं मोडलं. या डावातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने विस्फोटक फलंदाज ट्रेविस हेडला बाद करत माघारी धाडलं.

Mitchell Starc: मिचेल स्टार्कला याच दिवसासाठी KKR ने २४.७५ कोटी मोजले; हा व्हिडिओ कितीही वेळा बघा, नजर हटणारच नाही!
Pat Cummins Viral Video: पॅट कमिन्सने घेतला शाळकरी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद;Video व्हायरल

त्यानंतर त्याने नितीश रेड्डीला झेलबाद तर शाहबाज अमहदला त्रिफळाचित करत माघारी धाडले. त्याने या सामन्यात गोलंदाजी करताना ३ षटकात ३४ धावा करत ३ गडी बाद केले. या शानदार कामगिरीसह त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, तो सामन्यातील खेळाडू आहे.

Mitchell Starc: मिचेल स्टार्कला याच दिवसासाठी KKR ने २४.७५ कोटी मोजले; हा व्हिडिओ कितीही वेळा बघा, नजर हटणारच नाही!
IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: अय्यर ऑन फायर; हैदराबादचं वर्चस्व मोडून काढलं, कोलकाता फायनलमध्ये

गंभीरचा विश्वास सार्थ ठरवला

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याने या स्पर्धेत प्रवेश केला होता. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याला फलंदाजांनी चांगलाच चोप दिला होता. त्याला विकेट्सही मिळत नव्हत्या. साखळी फेरीतील १२ सामन्यांमध्ये त्याला

अवघ्या १२ विकेट्स घेता आल्या. त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र गंभीरने कोणाचंच ऐकलं नाही आणि त्याला सातत्याने संधी दिली. या संधीचं त्याने सोनं केलं आणि जेव्हा संघाला त्याची जास्त गरज होती, त्यावेळी त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. फायनलमध्येही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com