Vanita Kharat: उफ्फ वनी! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातने ऑस्ट्रेलियात दाखवला मराठमोळा अंदाज; VIDEO ने वेधलं लक्ष

Vanita Kharat Video: नुकताच वनिता खरातने ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर मराठमोळ्या लूकमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. वनिता खरातचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. वनिता खरातने ऑस्ट्रेलियात मराठमोळा अंदाज दाखवला.
Vanita Kharat Video
Vanita Kharat VideoSaam Tv

Maharashtrachi Hasya Jatra Show:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या (maharashtrachi hasya jatra) माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारी अभिनेत्री वनिता खरात सध्या चर्चेत आली आहे. वनिता खरात सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यवर आहे.

याठिकाणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची टीम ठिकठिकाणी कार्यक्रम करत आहे. याठिकाणी ही संपूर्ण टीम खूप धम्माल करत आहे. सोशल मीडियावर हे सर्व कलाकार नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आहेत. नुकताच वनिता खरातने ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर मराठमोळ्या लूकमध्ये व्हिडीओ शूट केला आहे. वनिता खरातचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

वनिता खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रत्येक वेळी नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच वनिताने ऑस्ट्रेलियातून एक व्हिडीओ शेअर केला. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वनिता खरातने निळा पदर असलेली मेहेंदी कलरची साडी नेसली आहे. या साडीवर तिने प्रिंटेड ब्लाऊज परिधान केला आहे. वनिता या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

वनिताने गळ्यामध्ये प्राजक्ता माळीच्या 'प्राजक्ताराज' ब्रँडचे दागिने कॅरी केले आहेत. मोकळे केस, कपाळावर चंद्रकोर आणि हातामध्ये हिरव्या बांगड्या घालून वनिताने आपला लूक परिपूर्ण केला आहे. 'वनिताने हमे जबसे मोहोब्बत हो गयी है...' या सुपरहिट गाण्यावर हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. वनिता खरातने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'परदेशात साडी नेसून फिरण्यात एक वेगळीच मज्जा आहे.' असे लिहिले आहे.

वनिता खरातचा पती सुमीत लोंढेने कमेंट करत 'माय लव्ह' असे लिहिले आहे. तर वनिता खरातच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. 'क्या बात है...बहुत खूब', 'खूपच सुंदर दिसते वनी', 'उफ्फ वनी', 'नेहमीसारखी सुंदर', 'महाराष्ट्रीय ब्युटी इन ऑस्ट्रेलिया', 'ओ खरात काकू...मस्तच हं' , अशाप्रकारच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काही चाहत्यांनी तिच्या पोस्टच्या कमेंट्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. वनिता खरातचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Vanita Kharat Video
Asatana Tu Song: आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणार, 'मायलेक'मधील 'असताना तू' गाणं रिलीज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com