Bharat Jadhav
भारतात स्वयंपाकाच्या गॅसचा इतिहास जवळजवळ सात दशकांचा आहे. त्याची सुरुवात तेल आणि वायूच्या शोधापासून झाली.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळची स्थापना १९५६ मध्ये झाली. यामुळे बॉम्बे हाय (मुंबई किनाऱ्याजवळ), आसाममधील दिग्बोई खोरे आणि कृष्ण गोदावरी खोरे येथून काढलेल्या तेल आणि वायूवर प्रक्रिया सुरू झाली.
स्वयंपाकाचा गॅस तेलासारखा आढळत नाही. एलपीजी हे प्रामुख्याने दोन वायूंचे मिश्रण असते. हे मिश्रण प्रोपेन आणि ब्युटेनचे असते. ते दोन पद्धतींनी तयार केले जाते, कच्चे तेल शुद्ध करणे आणि नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करणे.
भारत आसाम, गुजरात, राजस्थान, मुंबई आणि कृष्णा-गोदावरी खोऱ्यातून कच्चे तेल काढले जाते. भारताने रिफाइंड कच्च्या तेलाचे मोठे साठे देखील उभारले आहेत. हे साठे विशाखापट्टणम, मंगलोर आणि पुडूर येथे आहेत. ओडिशा आणि राजस्थानमध्येही तेलाचे साठे विकसित करण्यात आलेत.
भारत पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाइटनुसार, १९५५ मध्ये कंपनी बर्मा शेल म्हणून ओळखले जात होते. त्यानंतरच कंपनीने 'बर्शाने' या ब्रँड नावाने प्रथम एलपीजीची सुरूवात केली.
इंडियन ऑइलने १९६४ मध्ये इंडेन ब्रँड लाँच केला. २२ ऑक्टोबर १९६५ रोजी कोलकातामध्ये पहिले इंडेन एलपीजी कनेक्शन लावण्यात आले.