मराठी फिल्मइंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर स्त्री प्रधान चित्रपटांची क्रेझ चालु आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 'बाईपण भारी देवा' आणि 'नाच गं घुमा' च्या घवघवीत यशानंतर आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्नील जोशीचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बाई गं...' असं चित्रपटाचं नाव आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून आता चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालेलं आहे.
येत्या १२ जुलैला स्वप्नील जोशीचा 'बाई गं' चित्रपट रिलीज होणार आहे. त्या आधी चित्रपटातलं "जंतर मंतर" नावाचं गाणं रिलीज झालेलं आहे. "जंतर मंतर" या गाण्यात अभिनेता स्वप्नील जोशी वेगवेगळ्या वयोगटातील सहा हरहुन्नरी अभिनेत्रींसोबत आपला जलवा दाखवताना दिसतोय. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे,अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान ह्यांनी स्वप्नील जोशीसोबत "जंतर मंतर" गाण्यावर आपली जुगलबंदी दाखवली आहे.
अवधूत गुप्ते, कविता राम, मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर ह्यांनी "जंतर मंतर" ह्या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखाते ह्यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकर ह्यांनी लिहिले आहेत. "जंतर मंतर" हे गाणं आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंट वर पहायला मिळेल. "मितवा" चित्रपटानंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे ह्यांची जोडी 'बाई गं' ह्या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे ह्या जोडीचा एक वेगळाच फॅनबेस ह्या सिनेमासाठी उत्सुक आहे.
पांडुरंग कृष्णा जाधव यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर डॉ. आशिष अग्रवाल, नीतीन प्रकाश वैद्य आणि ओ. एम. जी मीडिया चेंबर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १२ जुलै २०२४ ला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'बाई गं' चं गाणं "जंतर मंतर" रिलीझ होताच प्रेक्षकांना भुरळ घालतय हे नक्की....
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.