Baipan Bhari Deva Television Premier: 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर, कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?

Baipan Bhari Deva World Television Premier: बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा 'स्टार प्रवाह' वाहिनीवर लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.
Baipan Bhari Deva World Television Premiere Where and When To Watch
Baipan Bhari Deva World Television Premiere Where and When To WatchSaam TV

केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा'ने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवलं आहे. चित्रपट जून २०२३ मध्ये चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत मराठी सिनेसृष्टीतला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला होता. बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ह्या चित्रपटाचा स्टार प्रवाह या वाहिनीवर लवकरच वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

Baipan Bhari Deva World Television Premiere Where and When To Watch
Sitaare Zameen Par : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' संदर्भात मोठी अपडेट, चित्रपटाच्या शूटिंगला केव्हा पासून होणार सुरूवात ?

सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना १९ मे ला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. फक्त महिला वर्गानेच नाही तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच चित्रपटाचे कौतुक केले. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं या चित्रपटाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरते.

Baipan Bhari Deva World Television Premiere Where and When To Watch
Ashok Saraf Speech : "आजवर अनेक अवॉर्ड्स मिळाले, पण आजचा पुरस्कार..."; मंगेशकर पुरस्कारानंतर अशोक सराफांनी व्यक्त केल्या भावना

'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ७६.५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या काही दिवसांत, नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले. जया, शशी, साधना, चारु, केतकी आणि पल्लवी या सहा बहिणींची कथा मराठी सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट गेल्या ३० जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Baipan Bhari Deva World Television Premiere Where and When To Watch
‘भव्य दिव्यता, रोमान्स अन् ड्रामा...;’ संजय लीला भन्साळीच्या ‘Heeramandi’ वेबसीरीजवर जेनेलिया काय म्हणाली?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com