Jackie Shroff SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jackie Shroff : "लाइट बंद कर..."; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले, पाहा व्हायरल VIDEO

Jackie Shroff Viral Video : बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींना ओरडताना दिसत आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकलेले पाहायला मिळत आहे.

व्हिडीओत जॅकी श्रॉफ यांच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजे अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचा हटके अंदाज प्रेक्षकांना कायम आवडतो. त्यांच्या स्टायलिश लूकचे तर लाखो चाहते दिवाने आहेत. अशात आता जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींवर भडकताना दिसत आहेत.

नुकतेच जॅकी श्रॉफ मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाले. त्यांच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी काळ्या रंगाचा टी-शर्ट, पँट आणि जॅकेट परिधान केले होते. त्यात डोळ्याला काळा गॉगल देखील लावला होता. जॅकी श्रॉफ खूपच कूल दिसत होते. जॅकी श्रॉफ यांना पाहून पापाराझींनी त्यांना घेरले. तेव्हा जॅकी श्रॉफ यांनी देखील कॅमेऱ्यांसमोर पोझ दिली. मात्र पापाराझींच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश जॅकी श्रॉफ यांच्या डोळ्यात जात होता. ज्यामुळे ते संतापले.

जॅकी श्रॉफ पापाराझींना म्हणाले की, "लाइट बंद कर बे अंधे...तुला दिसत नाही का?" त्यानंतर पापाराझी फ्लॅश लाइट बंद करतात. तेव्हा जॅकी श्रॉफ त्यांची संवाद साधतात आणि तेथून निघून जातात. जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

वर्कफ्रंट

जॅकी श्रॉफ यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. जॅकी श्रॉफ आता लवकरच 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटात जॅकी श्रॉफ हे अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT