Amitabh Bachchan-Rekha : अमिताभ बच्चनला इम्प्रेस करण्यासाठी रेखाने केली होती 'ही' खास गोष्ट, वाचून तुम्ही व्हाल आश्चर्यचकित

Amitabh Bachchan-Rekha Affair : अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाते कायम चर्चेचा विषय असते. आता त्यांच्या नात्याबद्दल एक खास गोष्ट समोर आली आहे. रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचे मन जिंकण्यासाठी काय केले होते, जाणून घेऊयात.
Amitabh Bachchan-Rekha Affair
Amitabh Bachchan-RekhaSAAM TV
Published On
Summary

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याविषयी सोशल मीडियावर कायम चर्चा रंगते.

अमिताभ बच्चन यांच्यासाठी रेखा यांनी नॉनव्हेज सोडले होते.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट एकत्र केले आहे.

बॉलिवूड सुपरस्टार रेखा (Rekha ) या कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. कायम त्यांच्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. रेखा यांचे नाव बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत कायम जोडले जाते. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आता त्यांच्या नात्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, रेखा यांनी अमिताभ बच्चन यांना खुश करण्यासाठी नॉनव्हेज सोडले होते. त्या सेटवर मांसाहारी जेवण जेवत नव्हत्या. 'हिंदी रश'ला दिलेल्या एका खास मुलाखतीत, ज्येष्ठ पत्रकार पूजा सामंत यांनी सांगितले की," त्या काळात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याच्या चांगल्या चर्चा रंगल्या होत्या. जेव्हा ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या लग्नात रेखा कुंकू लावून आल्या, तेव्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले. "

पुढे पूजा सामंत म्हणाल्या, "मला एका ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितले, रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचे मन जिंकण्यासाठी नॉनव्हेज खाणे सोडले होते. त्या अभिनेत्रीने दोघांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती म्हणाली की, रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेरच्या बातम्यांमध्ये तथ्य होते.अमिताभ बच्चन हे शाकाहारी असल्यामुळे रेखा यांनी व्हेज जेवण सुरू केले. शूटवर देखील रेखा नॉनव्हेज खात नव्हत्या."

शेवटी पूजा सामंत म्हणाल्या, "मला अभिनेत्रीने सांगितले की, अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यात हळूहळू जवळीक वाढली होती. मात्र कालांतराने त्यांच्या नात्यात दुरावा आला." मीडिया रिपोर्टनुसार, 1981 ला रिलीज झालेला 'सिलसिला' चित्रपट हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा शेवटचा ठरला.

Amitabh Bachchan-Rekha Affair
‘Bigg Boss 19’ मध्ये फराह खान अमाल मालिकवर नाराज, नेहल चुडासमाला सुनावले खडेबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com