

अनेकदा आपण खूप मेहनत करतो, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, यामागे घरातील वास्तुदोषही एक कारण असू शकतात. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्यासाठी एक ठरावीक दिशा सांगितली आहे. या नियमांनुसार वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते, असं मानलं जातं. घरातील कचरापेटी म्हणजेच डस्टबिन ठेवतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात डस्टबिन नेमका कोणत्या दिशेला ठेवावा? चुकीच्या दिशेला कचऱ्याचा डबा ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतात? जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, घरातील कचरापेटी दक्षिण-पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं. दक्षिण-पश्चिम दिशा ही कचरा किंवा टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या दिशेला डस्टबिन ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
याशिवाय घरातील कचरापेटी उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेला डस्टबिन ठेवल्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. तसंच कचऱ्याचा डबा घराबाहेर ठेवू नये, तो नेहमी घराच्या आतच ठेवावा, असं वास्तुशास्त्रात सांगितलंय.
वास्तुशास्त्र हे प्राचीन भारतीय शास्त्र आहे. हिंदू ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. घरात कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी, याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांनुसार घरातील वस्तूंची योग्य मांडणी केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि वातावरण सुख-समृद्धीचे राहते, असं मानलं जातं.
ज्योतिषाचार्य पंडित रामगोविंद शास्त्री यांच्या मते, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. यमाला मृत्यू आणि बदलाचा देव मानलं जातं. त्यामुळे या दिशेचा संबंध नाश, क्षय आणि टाकाऊ वस्तूंशी जोडला जातो. म्हणूनच कचरा किंवा नासधूस दर्शवणाऱ्या वस्तू दक्षिण दिशेला ठेवणं योग्य मानलं जातं.
वास्तुशास्त्रात उत्तर-पूर्व दिशा म्हणजेच ईशान्य दिशा अतिशय शुभ मानली जाते. या दिशेचा संबंध जलतत्त्वाशी जोडला जातो. त्याचप्रमाणे ही दिशा ज्ञान आणि समृद्धीची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला कचरा किंवा डस्टबिन ठेवू नये, असं वास्तुशास्त्रात सांगितलंय.
उत्तर-पूर्व दिशेला डस्टबीन ठेवल्यास घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो, अशी मान्यता आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसंच मानसिक आणि आरोग्याशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.