'इक्कीस' चित्रपट 1 जानेवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'इक्कीस' धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
'इक्कीस'मधून अगस्त्य नंदाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांच्या 'इक्कीस' चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर चित्रपट 1 जानेवारी 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.'इक्कीस' नवीन वर्षात रिलीज झाला आहे. हा चित्रपट धर्मेंद्र यांचा शेवटचा ठरला. गेल्यावर्षी 24 नोव्हेंबरला धर्मेंद्र यांचं निधन झाले. आता चित्रपटासाठी चाहते थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहे.
धर्मेंद्र यांना मोठ्या पडद्यावर पाहून चाहते भावुक झाले आहेत. 'इक्कीस'ने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली आहे. 'इक्कीस' चित्रपटातून बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नातूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर झळकला आहे. चित्रपटाचे पहिल्या दिवशीची कमाई जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'इक्कीस' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.00 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने वीकेंडला अजून तगडी कमाई केली तर 'इक्कीस' नक्कीच 'धुरंधर'ला तगडी टक्कर देणार आहे. 'इक्कीस' पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल पाहायला मिळतात. 'इक्कीस' चित्रपट श्री राम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे.
'इक्कीस' चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळत आहे. यात धर्मेंद्र, अगस्त्य नंदा यांच्यासोबत जयदीप अहलावत, आद्यांशी कपूर, एकवली खन्ना, सिमर भाटिया, श्री बिश्नोई, सिकंदर खेर हे कलाकार झळकले आहेत. चित्रपटात अगस्त्य नंदा अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसत आहे. 'इक्कीस' चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. यात भारत-पाकिस्तान युद्ध दाखवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.