Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

Tv Actor Father In Law Death : प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दुःखद बातमी समोर आली आहे.
Tv Actor Father In Law  Death
Famous Actorsaam tv
Published On
Summary

मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अभिनेत्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले.

मनोरंजनसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचे निधन झाले आहे. वडीलांच्या अचानक जाण्याने अर्जुनची बायको नेहा स्वामीला मोठा धक्का बसला आहे. नेहाच्या वडीलांचे नाव राकेश चंद्र स्वामी असे आहे. 1 जानेवारी 2026 ला सकाळी राकेश चंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होते. वडीलांच्या निधनानंतर बिजलानी आणि स्वामी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुन बिजलानी आपली बायको आणि मुलांसोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दुबईला गेला होता. तिथे त्यांना समजले की नेहाच्या वडीलांची तब्येत बिघडली आहे. दोघे ट्रिप रद्द करून मुंबईला पोहचले. सोमवारी संध्याकाळी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांना ताबडतोब बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस राकेश स्वामी व्हेंटिलेटरवर होते.

अर्जुन बिजलानी आपल्या सासऱ्यांना वडीलांप्रमाणे जपायचा. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी आणि मित्र परिवार राकेश स्वामी यांच्या अंत्यसंस्काराला आले होते. सोशल मीडियावर अर्जुन बिजलानीचा एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अर्जुन बिजलानी त्याचा मुलाला सावरताना दिसत आहे. तो मुलाला मिठी मारतो आणि रडू लागतो.

2013 ला अर्जुन बिजलानी आणि नेहा स्वामी यांनी लग्नगाठ बांधली. आजवर अर्जुन बिजलानीने अनेक टिव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तर त्याने रिअ‍ॅलिटी शो, तसेच होस्टिंग देखील केले आहे.

Tv Actor Father In Law  Death
Rinku Rajguru : कातिल अदा अन् घायाळ करणारी नजर; रिंकू राजगुरूनं केली जबरदस्त लावणी, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com