Big Boss फेम अन् टीव्ही अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लालभडक लेहेंग्यातील Photo व्हायरल

Roopal Tyagi Ties the Knot in Ceremony: टीव्ही अभिनेत्री रूपल त्यागीने ५ डिसेंबर रोजी तिच्या प्रियकराशी लग्न केले. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात होत आहेत.
Roopal Tyagi Ties the Knot in Ceremony
Roopal Tyagi Ties the Knot in CeremonySaam
Published On

'सपने सुहाने लडकपन के' या सिरियलमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रूपल त्यागी आता तिच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरूवात करत आहे. रूपल लग्नाच्या बेडीत अडकली असून, तिनं प्रियकराशी लग्न केलं आहे. रूपलचा विवाह सोहळा ५ डिसेंबर रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. तिनं नुकतेच फोटो शेअर करून या बातमीवर शिक्कामोर्तब केला. सध्या तिची लग्नाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

रूपलने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिनं ब्राइडल लूक देखील शेअर केला आहे. लाल लेहेंग्यामध्ये रूपला सुंदर आणि मोहक दिसत आहे. तिने केस सोडले. हातात लाल रंगाचा चुडा घातलेला आहे. तिनं विविध पोझमध्ये फोटो शूट करून सोशल मीडियात शेअर केले आहेत.

रूपलच्या लेहेंग्यावर #RoopNoom लिहिले आहे. तर, तिचा पती नोमिश भारद्वाज यांनी लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. रूपलने सांगितले की, 'लग्न घाईघाईत झाले. अजूनही काही विधी बाकी आहेत'. काही खास आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

दरम्यान, नोमिशने सांगितले की, एका मित्राद्वारे रूपल आणि त्याची भेट झाली. मैत्रीचं रूपांतर काही दिवसांत प्रेमात झालं. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केलं, अशी माहिती त्यानं दिली. नोमिश भारद्वाज हा अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. तर, रूपल अभिनेत्री असून, ती बिग बॉस सीझन ९ चाही भाग होती. तिनं काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com