Vastu Tips For Roti: या ५ दिवशी घरात कधीही भाकरी शिजवू नये; पाहा वास्तू शास्त्र काय सांगतं?

Vastu Tips For Roti: हिंदू परंपरेनुसार काही विशेष दिवशी घरी ताजी भाकरी बनवणं अशुभ मानलं जातं. नागपंचमी, शरद पौर्णिमा, शीतला अष्टमी आणि दिवाळी यांसारख्या सणांमध्ये स्वयंपाकाबाबत खास नियम पाळले जातात.
Holi Vastu Tips
Holi Vastu Tipssaam tv
Published On

हिंदू धर्मात काही खास दिवस असतात ज्या दिवशी घरी ताजी भाकरी बनवणं निषिद्ध मानण्यात येतं. वास्तुशास्त्रानुसार, काही विशिष्ट दिवशी भाकरी बनवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि कुटुंबाच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो.

ज्योतिषी आणि वास्तु तज्ञांच्या मते, अशा दिवशी भाकरी बनवल्याने गरिबी, देवी लक्ष्मीची नाराजी, नकारात्मक ऊर्जा आणि पूर्वजांचा अपमान अशा समस्या उद्भवू शकतात. वास्तुशास्त्रानुसार असे कोणते दिवस आहेत ज्या दिवशी भाकरी बनवू नयेत ते जाणून घेऊया.

Holi Vastu Tips
Clock Vastu Shastra: चुकीच्या दिशेला लावलेलं घड्याळ आयुष्यात आणेल वाईट वेळ; कंगाल होण्यापूर्वी जाणून घ्या वास्तू टीप्स

नागपंचमी

नागपंचमीला तव्यावर किंवा चुलीवर भाकरी बनवणं निषिद्ध मानण्यात येतं. तव्याला नागदेवतेचे प्रतीक मानलं जातं. असं मानण्यात येतं की, या दिवशी तव्यावर भाकरी बनवल्याने नागदेवता नाराज होतात. त्याचप्रमाणे कुटुंबावर वाईट परिणाम होऊ शकतात.

शरद पोर्णिमा

शरद पौर्णिमा हा धन आणि सौभाग्याची देवी लक्ष्मीच्या अवताराचा दिवस मानला जातो. या दिवशी खीर किंवा पुरी बनवणं शुभ मानण्यात येतं. परंतु या दिवशी भाकरी बनवणं अशुभ मानलं जातं. शास्त्रांनुसार, चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर खाल्ल्याने सौभाग्य आणि समृद्धी मिळते.

शितला अष्टमी

शीतला अष्टमीच्या दिवशी शीतला देवीला शिळे अन्न अर्पण केलं जातं. या दिवशी ताजी भाकरी बनवण्यास मनाई केली जाते. घरी फक्त आदल्या दिवशी तयार केलेलं अन्नच खाल्लं जातं. या परंपरेला केवळ धार्मिक महत्त्वच नाही तर कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देखील शुभ मानण्यात येतं.

Holi Vastu Tips
Vastu Tips: घरात झाडू कोणत्या दिशेला ठेवावा? तुम्हीही चूक करत असाल तर योग्य दिशा जाणून घ्या

दिवाळी

वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीत घरी भाकरी बनवणं अशुभ मानलं जातं. या दिवशी हलवा, पुरी आणि खीर असे पदार्थच शुभ मानण्यात येतं. देवी लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी ही परंपरा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Holi Vastu Tips
Vastu Tips: घरातील या दिशेला कचराकुंडी ठेवणं मानलं जातं अशुभ; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com