

असं मानलं जातं की, झाडू योग्य ठिकाणी ठेवल्याने घरात समृद्धी येण्यास मदत होते. दरम्यान अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसल्याने बरेच लोक बाथरूममध्ये, स्वयंपाकघरात किंवा दाराजवळ कुठेही झाडू ठेवतात. जे वास्तुनुसार चुकीचं मानण्यात येतं. यामुळे घरात अनेक समस्या येऊ शकतात.
मात्र वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्हाला आर्थिक नुकसान किंवा आर्थिक अडचणी टाळायच्या असतील तर घरात झाडू योग्य दिशेला ठेवली पाहिजे. ही योग्य दिशा कोणती आहे ते जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला झाडू ठेवणं शुभ मानलं जातं. ही दिशा स्थिरता आणि सुरक्षिततेशी संबंधित आहे. झाडू अशा ठिकाणी ठेवली पाहिजे की, कोणालाही सहज दिसणार नाही. झाडू नेहमी बंद जागी ठेवली पाहिजे. जसं की स्टोअररूम किंवा कपाटाच्या तळाशी. यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
लोक अनेकदा त्यांच्या घरात झाडू उभी ठेवतात. मात्र अशा पद्धतीने झाडू ठेवणं अशुभ मानलं जातं. झाडू नेहमी जमिनीवर ठेवावी. त्याचप्रमाणे झाडूवर कोणाचा पाय पडणार नाही याची खात्री करावी. झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे त्याचा अनादर करू नये.
झाडू खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे अमावस्या, मंगळवार, शनिवार आणि रविवार. तुम्ही यापैकी कोणत्याही दिवशी झाडू खरेदी करू शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.