

वास्तुशास्त्रानुसार किचन हे फक्त स्वयंपाक करण्याचं ठिकाण नाही तर ते घराच्या कल्याणाचं आणि समृद्धीचं प्राथमिक केंद्र मानलं जातं. अनेकदा दिवसभरातील ऑफिसच्या थकवणाऱ्या दिवसानंतर आपण रात्री किचनमध्ये काही गोष्टी अशाच सोडून देतो. परंतु या छोटाश्या निष्काळजीपणामुळे तुमच्या घरात नकारात्मकता येऊ शकते.
वास्तू शास्त्रानुसार, तुम्ही झोपण्यापूर्वी किचनमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या सोडून देऊन नये. या कोणत्या गोष्टी आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया.
रात्रीच्या वेळी सिंकमध्ये घाणेरडी भांडी ठेवणं हा एक वास्तुदोष मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, घाणेरडी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. स्वयंपाकघर घाणेरडं ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. यामुळे तुमच्या घरावर आर्थिक अडचणी देखील येतात. घाणेरड्या भांड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढतात, जे घरातील सदस्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
रात्रीच्या वेळी लोक स्वयंपाकघरात रिकामी भांडी ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार , स्वयंपाकघरात रिकामं पाण्याचं भांडे ठेवणं शुभ मानलं जात नाही. रिकामं भांडे हे जीवनातील शून्यता आणि तणावाचं प्रतीक मानलं जातात. घरात सुख आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नेहमीच कमीत कमी एक भांडं पाणी भरलं पाहिजे.
स्वयंपाकघरातील गॅसवर सांडलेलं पीठ, मसाले किंवा भाज्यांची टरफल राहू आणि केतूचे दुष्परिणाम वाढवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री स्वयंपाकघर स्वच्छ न केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती कमकुवत होते. ज्याचा थेट परिणाम मानसिक शांती आणि करिअरवर होतो.
अनेक घरांमध्ये सकाळची घाई असल्याने रात्री कणीक मळून ठेवली जाते. मात्र पुराण आणि शास्त्रांनुसार, पीठ मळून ठेवल्याने ते 'पिंड' मानलं जातं. रात्रभर ते राहिल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते. शिवाय आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.