Sunny Deol: वडील धर्मेंद्र यांना शेवट मोठ्या पडद्यावर पाहून सनी देओलला अश्रू अनावर; या अभिनेत्रीने केलं सांत्वन

Sunny Deol: बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक धर्मेंद्र आता आपल्यात नाहीत. धर्मेंद्रच्या शेवटच्या चित्रपट प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी सनी देओल आणि बॉबी देओल खूप भावूक झाले.
Sunny Deol
Sunny DeolSaam Tv
Published On

Sunny Deol: बॉलीवूड दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा 'इक्कीस' हा चित्रपट फार खास आहे. या चित्रपटाला इतरांपेक्षा वेगळे करणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा दिग्गज बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे. धर्मेंद्र हे एक फिल्म आयकॉन होते त्यांनी साकारलेली पात्रे नेहमीच प्रेक्षकांच्या कायम मनात राहतील. धर्मेंद्र यांचे अचानक जाणे त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होतेच, पण त्यांच्या कुटुंबालाही दु:ख झाले आहे.

धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि इतर चित्रपट कलाकार उपस्थित होते. हा प्रसंग सर्वांसाठी खूप भावूक करणारा होता. धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलगे, सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही हजेरी लावली. वडिलांना शेवटच्या वेळी मोठ्या पडद्यावर पाहताना दोन्ही कलाकारांना अश्रू अनावर झाले.

Sunny Deol
Famous Actor mother Dies: प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; संथाकुमारी यांचे दिर्घकालीन आजाराने निधन

अमिषाने सनीचे सांत्वन केले

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये अभिनेत्री अमिषा पटेल सनी देओलचे सांत्वन करताना दिसत आहे. दोघांनी "गदर" आणि "गदर २" चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच भावनिकही वाटत आहे. वडिलांना पडद्यावर पाहून सनी रडू लागतो आणि अमिषा त्यांना सांत्वन देण्यासाठी पुढे येते.

Sunny Deol
Don 3: रणवीर सिंहच्या एक्झिटनंतर 'या' अभिनेत्याचं नशीब उजळणार; फरहान अख्तरच्या 'डॉन ३'मध्ये करणार धमाकेदार एन्ट्री?

चित्रपटात आणखी कोण आहे?

सनी आणि बॉबी व्यतिरिक्त, व्हिडिओमध्ये अमिषा, टायगर श्रॉफ, गायक मिका, मनीष पॉल आणि अभय देओल सारखे कलाकार आहेत. धर्मेंद्र यांच्या व्यतिरिक्त, 'इक्कीस' मध्ये अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा, जयदीप अहलावत, विवान शाह आणि सिकंदर खेर सारखे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाद्वारे अगस्त्य रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. हा चित्रपट १ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com