दारू पिऊ नका एवढंच सांगितलं… होळीच्या रंगात रक्तरंजित थरार; नेमकं काय घडलं?

Holi Day Assault Case In Kalyan Titwala: कल्याण टिटवाळ्यातील नेप्च्यून स्वराज सोसायटीत होळीच्या दिवशी जुना वाद उकरून काढत तिघांनी सोसायटी सेक्रेटरी, त्यांच्या मुलगा आणि शेजाऱ्यावर हल्ला केला.
CCTV grab of the violent assault inside Neptune Swaraj Society, Titwala, during Holi celebrations
CCTV grab of the violent assault inside Neptune Swaraj Society, Titwala, during Holi celebrationsSaam Tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

सोसायटीचा सेक्रेटरी असताना मद्यपी तरुणांना इतकेच सांगितले की, दारु पिऊन सोसायटीत येऊ नका. यावरुन वाद झाला होता. मात्र या वादाचा राग होळीच्या दिवशी काढण्यात आला. मद्यपी तीन तरुणांनी एका तरुणाला मारहाण सुरु केली. मध्यस्थी करायला आलेल्या तरुणाच्या वडिलांसह सोसायटीतील एका रहिवासीयाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. सोसायटीत गुंडगिरी करणाऱ्यांच्या विरेाधात ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित नागरीकांनी टिटवाळा पोलिसांवर केला आहे.

CCTV grab of the violent assault inside Neptune Swaraj Society, Titwala, during Holi celebrations
Influencers Harassed in Mumbai: बिहारींनी लाज काढली! विदेशी क्रिएटरसोबत भररस्त्यात अश्लील कृत्य, मुंबई पोलिसांनी शिकवला धडा

टिटवाळ्यात नेप्च्यून स्वराज सोसायटी आहे. काही महिन्यापूर्वी सुरेश उपाध्यय हे या सोसायटीत सेक्रेटरी होते. एक दिवशी सोसायटीत काही रहिवासी तरुण दारु पिऊन सोसायटीत आले. त्यांनी धिंगाणा घातला. यावरुन सेक्रेटरी असल्याने उपाध्याय यांनी मद्यपी तरुणांना समज दिली. या वादानंतर संकेत जाधव या तरुणाने सुरेश उपाध्याय यांच्या गाडीची काच फोडली होती. संकेत याने या प्रकरणी माफी मागितल्याने या प्रकरणात पोलिसात तक्रार केली गेली नाही.

CCTV grab of the violent assault inside Neptune Swaraj Society, Titwala, during Holi celebrations
Dombivli to Thane Bus: डोंबिवलीवरुन ठाण्याला फक्त २० रुपयात; केडीएमटीने सुरु केली नवी बससेवा

मंगळवारी होळी असताना संकेत जाधव, सुशांत जाधव, राहूल पाटील या तिघांनी जुन्या वादाच्या रागातून सुरेश उपाध्याय यांचा मुलगा अमन याला बोलावून घेतले. त्याला बेदम मारहाण केली. कसा बसा आमन हा तिघांच्या तावडीतून सुटला. घराजवळ आला असता तिघांनी पाठलाग केला. यावेळी अमन याचे वडिल सुरेश आणि शेजारी राहणारे शशिकांत गुप्ता हे मध्यस्थीसाठी पुढे आले. तिघांनी त्या दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

CCTV grab of the violent assault inside Neptune Swaraj Society, Titwala, during Holi celebrations
Thackeray Brothers : ठाकरे बंधुंमध्ये पुन्हा बिनसलं? राज ठाकरेंनी नाकारला उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव; राजकारणात मोठी खळबळ

या मारहाणीत गुप्ता यांना गंभीर दुखापात झाली आहे. त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहे. या प्रकरणात टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप पिडीतांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com