Influencers Harassed in Mumbai: बिहारींनी लाज काढली! विदेशी क्रिएटरसोबत भररस्त्यात अश्लील कृत्य, मुंबई पोलिसांनी शिकवला धडा

Influencers Harassed in Mumbai: मुंबईतील धोबीघाट परिसरात पोर्तुगालच्या महिला कंटेंट क्रिएटरसोबत छेडछाड झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली.
Influencers Harassed in Mumbai
Influencers Harassed in MumbaiSaam Tv
Published On

Influencers Harassed in Mumbai: मुंबई शहरातील धोबीघाट परिसरात परदेशी महिला पर्यटक आणि कंटेंट क्रिएटरची छेड काढल्याची घटना समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. आयनस फारिया (वय अंदाजे २८) ही पोर्तुगालची कंटेंट क्रिएटर भारत फिरण्यासाठी मुंबईत आली असताना २२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास तिच्यासोबत हा प्रकार घडला.

फारिया धोबीघाट परिसराचे शूट करत असताना दोन तरुणांनी तिच्याकडे वारंवार सेल्फी घेण्याचा आग्रह धरत तिचा पाठलाग केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुण “प्लीज, एकदा… एक सेल्फी… दोन सेकंद पण नाही लागणार…” असे म्हणत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. फारियाने स्पष्ट नकार दिल्यानंतरही ते काही अंतरापर्यंत तिच्या मागे गेले, हातवारे करत संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

Influencers Harassed in Mumbai
Govinda: 'गोविंदाचं करियर यामुळे खराब झालं...'; या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने दखल घेत फारियाशी संपर्क साधला. मेसेजद्वारे तिचा संपर्क क्रमांक आणि निवासाचा तपशील मागवून अधिकृत निवेदन नोंदवण्यात आले. फारियाने पोलिसांना पूर्ण सहकार्य करत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.

Influencers Harassed in Mumbai
Wedding Hairstyle: लग्नसराईसाठी साडीवर करा ५ मिनिटांत होणाऱ्या या ७ ट्रेंडी बन हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

तपासादरम्यान पोलिसांनी मनखुश कुमार शर्मा (वय २६) आणि गुलशन शर्मा (वय २८) अशी दोन्ही संशयितांची ओळख पटवली. दोघेही मूळचे उत्तर भारतातील असून कामानिमित्त मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या छेडछाड, महिलेला विनयभंग करण्याच्या उद्देशाने पाठलाग (स्टॉकिंग) आणि त्रास देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मनखुश शर्मा याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरा आरोपी गुलशन शर्मा हा होळीसाठी बिहार येथे गेला असताना त्यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com