Kandahar series Twitter
मनोरंजन बातम्या

IC 814 The kandahar Hijack : IC 814 कंदहार विमान अपहरण सिरीज अडकली वादाच्या भोवऱ्यात..

Boycott IC814 The Kandahar Hijack: विमान अपहरणकर्त्याना हिंदू नावे दिल्याने #BoycottBollywood ट्रेंड चालवून नेटकऱ्यानी व्यक्त केला संताप..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नेटफ्लिक्सवर नुकत्याच रिलीज झालेल्या IC 814 या कंदहार विमान अपहरणावर आधारित सिरिजला प्रेक्षकांनी एकीकडे चांगली पसंती दिली आहे. तर दुसरीकडे मात्र या सिरीजवरून आता वाद निर्माण झालेला बघायला मिळत आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना समन्स पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाने नेटफ्लिक्सकडून ओटीटी मालिकेतील वादग्रस्त पैलूंबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

या विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर, सनी अहमद, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी आहेत. पण वेबसिरीजमध्ये त्यांची नावे बदलण्यात आली असून दहशतवाद्यांना भोला आणि शंकर अशी नावे देण्यात आली असल्याने वाद निर्माण झाला आहे. वेबसिरीज रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरून त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

काय आहे वेबसिरीज कथा ?

या मालिकेची कथा 24 डिसेंबर 1999च्या सत्य घटनेवर आधारित आहे. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीला जात असताना पाच दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या IC 814 या विमानाचे अपहरण केले.

ज्यामध्ये 176 प्रवासी प्रवास करत होते. अमृतसर, लाहोर, दुबईमार्गे दहशतवादी विमान कंदहारला घेऊन जातात. प्रवाशांना सात दिवस ओलीस ठेवले होते. या काळात विमानातील प्रवाशांची काय स्थिती असेल? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या प्रवाशांना सोडण्यासाठी सरकारपुढे कोणती अट ठेवली आहे?

दहशतवाद्यांच्या अटी मान्य करायला सरकारला कसे भाग पाडले जाते? हे सर्व या मालिकेत दाखवले आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आहेत. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, विजय वर्मा, दिया मिर्झा, पत्रलेखा, अरविंद दहशतवाद्यांच्या अटी मान्य करायला सरकारला कसे भाग पाडले जाते? हे सर्व या मालिकेत दाखवले आहे.

या मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आहेत. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, विजय वर्मा, दिया मिर्झा, पत्रलेखा, अरविंद स्वामी आणि कुमुद मिश्रा यांनी या 6 भागांच्या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

नेटकऱ्यांकडून चालवला जातोय #BoycottBollywood चा ट्रेंड

दरम्यान, दहशदवाद्याना हिंदू नवे दिल्याने नेटकऱ्यानी चांगलाच संताप व्यक्त केलेल्या दिसत असून #boycott_bollywood हा ट्रेंड सोशल मिडियावर आज चर्चेचा विषय ठरत आहे.

एका यूजरने म्हटले आहे की, "IC814 अपहरणकर्त्यांची नावे @anubhavsinha यांनी बदलून शंकर आणि भोला केली आहेत: अशा प्रकारे बॉलीवूडने दहशतवाद्यांना जिंकू दिले: #BoycottBollywood #IC814TheKandaharHijack."

दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, "#बॉलिवुड नेहमीच राष्ट्रावर काळा डाग राहिला आहे. बॉलीवूडने कधीही आमचे राष्ट्रहित समजले नाही. बॉलिवूड भारताला वाईट प्रकाशात दाखवते. IC 814 दहशतवादी धर्माने इस्लामिक होते आणि वेबसिरीजमध्ये त्यांना भोला आणि शंकर सारखे हिंदू असे नाव देण्यात आले होते. #BoycottBollywood."

एका ट्विटर यूजरने आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "आम्ही नेटफ्लिक्स आणि अनुभव सिन्हा यांच्या या हिंदूफोबिक चित्रपटावर बहिष्कार घालू शकतो का ज्यात भोला आणि शंकर नावाचे IC814 अपहरणकर्ते दाखवले आहेत, लक्षात ठेवा लालसिंग चड्ढा सुपर फ्लॉप असल्याची खात्री करून आम्ही अमीरला कसे गुडघे टेकायला लावले होते ? अब इस मुव्ही को भी गटर में डाल दो ."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT