नेटफ्लिक्स या वर्षाच्या अखेरीस त्याच्या निवडक प्लॅनची किंमत वाढवू शकते. स्लॅशडॉटच्या अहवालानुसार, जेफरीज नावाच्या एका संशोधन संस्थेने दावा केला की, Netflix तीन कारणांमुळे Q4 किंवा डिसेंबर २०२४ पर्यंत त्याच्या मानक आणि जाहिरात-समर्थित प्लॅनची किंमत वाढीची घोषणा करू शकते.
२०२४ च्या अखेरीस किंमती वाढतील का?
नेटफ्लिक्सच्या स्टॅण्डर्ड प्लॅनची किंमत जानेवारी २०२२ मध्ये वाढवण्यात आली होती, त्यामुळे आता किमती पुन्हा वाढू शकतात. उद्योगाच्या तुलनेत सर्वात कमी किंमतीत जाहिरात-समर्थित प्लॅनदेखील ऑफर केले जात आहेत. कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्पोर्ट्सची कॅटेगरी देखील जोडली आहे. त्यामुळे ही संशोधन फर्म म्हणते की नेटफ्लिक्स २०२४ च्या अखेरीस किंमत वाढवण्याची घोषणा करू शकते.
यापूर्वी नेटफ्लिक्सने केवळ ऑक्टोबर २०२३ मध्ये त्याच्या मूलभूत आणि प्रीमियम योजनांच्या किमती वाढवल्या होत्या. संशोधन फर्मचा दावा आहे की, नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनदेखील काढून टाकू शकते. २०२५ मध्ये नवीन प्लॅन आणले जातील, असा दावाही केला जातोय.
प्लॅटफॉर्मवरील सुधारणांमुळे वाढणार किमती
तसेच नेटफ्लिक्सने यापूर्वी २०२५ मध्ये WWE रॉच्या घोषणेनंतर प्लॅटफॉर्ममधील सुधारणांसाठी सदस्यांकडून थोडे अतिरिक्त शुल्क आकारू शकते, असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे किमतीत वाढ झाल्याची ही बातमी खरी असू शकते. मात्र अद्याप अधिकृतपणे काहीही दुजोरा मिळालेला नाही. भारतातही किमती वाढतील की नाही याबाबतही सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हे आहेत नवीन शो
नेटफ्लिक्सने वर्षाच्या शेवटी किमती वाढवण्यासाठी या वर्षभर तयारी केलीय. डिसेंबर २०२५ मध्ये ख्रिसमस एनएफएल गेम, २६ डिसेंबर रोजी स्क्विड गेम २, सीझन १ हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाहिला जाणारा नेटफ्लिक्स शो ठरलाय. जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणारा WWE रॉ आणि २०२५ मध्ये येणारा स्ट्रेंजर थिंग्ज ५ ही वेब सीरिज येणार आहे, त्यामुळेही या किमती वाढवल्या जाऊ शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.