'द कपिल शर्मा शो'मध्ये नेहमी अपमानित केलं जाणाऱ्या अभिनेत्याचा नेटफ्लिक्समधील एका वेबसीरिजमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. Netflix ची नवीन वेबसीरिज 'IC 814: The Kandahar Hijack' मध्ये व्हिलेनची भूमिका साकारत आपल्या अभिनयाने अभिनेत्याने सर्वांना आर्श्चयकित केलंय. आम्ही चर्चा करतोय राजीव ठाकूरची.
नेहमी आपल्या कॉमेडीच्या टाईमिंगमुळे अपमानित होणाऱ्या राजीव ठाकूर आपल्या दमदार अभिनयानाने कणखर व्हिलेन या वेबसीरिजमध्ये साकारलाय. राजीवचा आतापर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. कपिल शर्मा शोमध्ये आपल्या विनोदाने हसवणारा राजीव ठाकूर आता नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना घाबवरत आहे. नेटफ्लिक्सवर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित सीरिज प्रदर्शित करण्यात आलीय. काठमांडूहून दिल्लीला जाणारे हे विमान 24 डिसेंबर 1999 रोजी हायजॅक करण्यात आलं होतं.
अपहरण केल्यानतंर हे विमान पाकिस्तानातील अमृतसर आणि लाहौरला दुबई मार्गे नेण्यात आले होते. शेवटी अफगाणिस्तानातील कंदहारमधील तालिबान नियंत्रित भागात या विमान उतरवण्यात आलं होतं. ते आठवडाभर थांबवल होतं. ही घटना भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात मोठी अपहरणाची घटना मानली जातेय. दरम्यान या घटनेवर आधारित असलेल्या सीरिजमध्ये राजीव ठाकूरने दहशतवाद्याची भूमिका साकारलीय. वेबसीरिजमध्ये त्याने व्हिलेनचा दमदार रोल केला असून त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होतंय. राजीवचे सोशल मीडियावर या वेबसीरिजचं खूप कौतुक होतंय.
राजीव ठाकूर यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्याचे आई-वडील अतिशय साधे जीवन जगले. वडील श्रावणकुमार ठाकूर हे दुकानदार होते. तर आई प्रेमलता ठाकूर शिंपी होत्या. लहानपणी गरिबीत वाढलेल्या राजीवने आपल्या बिकट परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. राजीवचा शिक्षण आणि करिअरचा प्रवासही अप्रतिम आहे. पदवीचं शिक्षण घेतांना त्याने थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली
त्याच्या अभिनयाने महाविद्यालयात अनेक पुरस्कार जिंकले. त्याने गुरु नानक देव विद्यापीठात शिकत असतांना कपिल शर्मा त्याचा वर्गमित्र होता. त्याने अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले होते. एम कॉम करताना त्याने कलाकार कोट्यावर प्रवेश घेतला, यावरून त्यांची रंगभूमीची आवड दिसून येते. नाटकांपासून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर राजीवने अनेक हिंदी आणि पंजाबी नाटक केले. 2006 मध्ये पंजाबी रिॲलिटी कॉमेडी शो 'हसदे हसंदे रावो' मधून त्याचा अभिनय प्रवास सुरू झाला. यात तो सेकंड रनर अप म्हणून उदयास आला.
यानंतर 2007 मध्ये आलेल्या 'कॉमेडी सर्कस'मधील त्याच्या अभिनयाने त्याला एक नवी ओळख दिली आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या कॉमेडी आवडू लागली. 2009 मध्ये 'छोटे मियाँ बडे मियाँ' या शोच्या विजयाने त्याची लोकप्रियता अजून वाढली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.