.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सप्टेंबर हा सणांचा महिना मानला जातो. या महिन्यात गणेशोत्सव, संकष्टी चतुर्थी, शिक्षक दिन असे मोठे सण साजरे होतात. सप्टेंबर महिन्यात सुट्टीच्या दिवशी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात रिलीज होणारे कॉमेडी, थ्रिलर, क्राइम असे चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करतील. यानुसार जाणून घेऊयात सप्टेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या चित्रपटांबद्दल...
सप्टेंबर २०२४ मध्ये चित्रपट प्रेमींना अनेक गाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्यांचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत.
इमर्जन्सी
सोशल मिडियावर चर्चेत असणारा अभिनेत्री कंगना रनौत चा इमर्जन्सी हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत इंदिरा गांधींच्या मुख्य भुमिकेत दिसणार आहे.
द बकिंघम मर्डर्स
बॉलिवुडची स्टार करीना कपूर 'द बकिंघम मर्डर्स'या चित्रपटात एका डिटेक्टिव्ह सार्जंट जसमीत भामराची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री सिनेमा असून जो 13 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहात रिलीज होईल.
ग्रेट ऑफ ऑल टाइम (GOAT)
ग्रेट ऑफ ऑल टाइम (GOAT) या चित्रपटात विजयने मूख्य भुमिका साकारली आहे.या चित्रपटात प्रशांत मोहन, प्रभु देवा आणि मीनाक्षी चौधरी अशी स्टार कास्ट असणार आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
सेक्टर 36
विक्रांत मैसी आणि दीपक डोबरियाल यांचा क्राइम-थ्रिलर चित्रपट 'सेक्टर 36' हा चित्रपट 13 सप्टेंबरला नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे.
बर्लिन
अपारशक्ति खुराना आणि इश्वाक सिंहचा 'बर्लिन' हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
युध्रा
सिद्धांत चतुर्वेदीचा एक्शन-थ्रिलर चित्रपट 'युध्रा' चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मालविका मोहनन, राघव जुयाल आणि राम कपूर दिसणार आहे.
देवरा
देवरा या चित्रपटात जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, राम्या किश्नन अशी स्टारकास्ट आहे. देवरा हा चित्रपट २७ सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.