Anupam Kher: अनुपम खेर 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेल्याने फॅन्स भडकले, नेमकं काय झालं?

द कश्मीर फाईल्स'च्या वेळी 'द कपिल शर्मा शो'ला 'बॉयकॉट'चा सामना करावा लागला होता.
Anupam Kher and The Kapil Sharma Show
Anupam Kher and The Kapil Sharma ShowInstagram @anupampkher

Anupam Kher on The Kashmir Files: 'द कपिल शर्मा शो'ने आपल्या नव्या पर्वाची दमदार सुरूवात केली आहे. अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये आपली हजेरी लावत आहेत. दिग्गज अभिनेते अनुपम खेर हे सुद्धा या शोमध्ये उपस्थित राहिले होते. अनुपम खेर हे त्यांचा आगामी चित्रपट 'ऊंचाई'चे प्रमोशन करण्यासाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेले होते.

अनुपम खेर यांनी या शोमधील काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

Anupam Kher and The Kapil Sharma Show
The Keral Story: 'त्या' ३२,००० महिलांची 'द केरळ स्टोरी', हृदयद्रावक टीझर पाहिलात का?

११ नोव्हेंबरला 'ऊंचाई' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिताभ बच्चनसह अनुपम खेर, बोमन इराणी, सारिका आणि नीना गुप्ता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. अमिताभ बच्चन वगळता चित्रपटाची संपूर्ण कास्ट या शोमध्ये उपस्थित होती. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने शोमध्ये भरपूर मस्ती केली आहे आणि याचे काही फोटो अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये कपिल शर्मा अनुपम खेर यांना गालावर पप्पी देताना दिसत आहे. अनुपम खेर यांनी या फोटोंना कॅप्शन देखील दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'तुमच्या शोमध्ये खूप मजा आली. कपिल आणि अर्चनाकडून जे प्रेम मिळाले त्यासाठी धन्यवाद. मी इतका हसलो आहे की माझे गाल दुखत आहेत. त्याचबरोबर 'द कपिल शर्मा शो'च्या संपूर्ण टीमचे आभार.' (Comedy)

अनुपम खेर याचे हे फोटो सोशल मीडियावरील काही लोकांना खटकले आहेत. लोक अनुपम खेर यांना म्हणत आहे की, 'तुम्ही हे चांगलं नाही केलं, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती'. (Social Media)

द काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी कपिल शर्मावर आरोप केला होता की कपिलने त्यांना या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलावले नाही. अनुपान खेर यांनी कपिल शर्माची बाजू घेत यावर उत्तर दिले आहे. अनुपम खेर म्हणाले की, ''द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाचा विषय खूप गंभीर होता. आम्हला या चित्रपटाला कॅमेडी शोमध्ये प्रमोट करायचे नव्हते.' 'द कश्मीर फाईल्स'च्या वेळी 'द कपिल शर्मा शो'ला 'बॉयकॉट'चा सामना करावा लागला होता. (Bollywood)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com