DGCA Issues New SOP: विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी, उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्स प्रवाशांना Whatsappवर करणार मेसेज

DGCA Issues New SOP: DCGAने एअरलाइन्सच्या प्रवाशांसाठी नवे एसओपी जारी केले आहेत. इंडिगो फ्लाइट इंसिडेटमधील वाद झाल्यानंतर DCGAने मोठा निर्णय घेतला आहे.
plane
plane Saam Tv
Published On

DGCA SoPs for Delayed Flights: 

DCGAने एअरलाइन्सच्या प्रवाशांसाठी नवे एसओपी जारी केले आहेत. इंडिगो फ्लाइट इंसिडेटमधील वाद झाल्यानंतर DCGAने मोठा निर्णय घेतला आहे. आता विमानाचं उड्डाण विलंबाने होणार असल्यास एअरलाइन्स प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर माहिती देणार आहे. सर्व एअरलाइन्स कंपनीला DCGAने दिलेल्या एसओपीचं पालन करावं लागणार आहे. (Latest Marathi News)

एअरलाइन्सला कोणते एसओपी दिल्या आहेत?

विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्सला प्रवाशांना माहिती द्यावी लागणार आहे.

१) एअरलाइन्सला त्यांच्या संबंधित वेबसाइटवर माहिती द्यावी लागणार आहे.

२) विमानाची वाट पाहण्याऱ्या प्रवाशांना एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि ईमेलच्या मदतीने माहिती द्यावी लागणार आहे.

३) विमानतळावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना उड्डाणाचं विलंब होणार असल्याची माहिती द्यावी लागणार आहे.

४) विमानतळावर विमानाची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना उड्डाणाला का विलंब होणार, याची माहिती देखील द्यावी लागणार आहे.

plane
India Russia News: PM मोदींचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?

DGCA ने काय सांगितलं?

विमान उड्डाणाला उशीर होणे, रद्द होणे किंवा कोणत्याही सूचनेशिवाय अधिकचा वेळ उड्डणासाठी विलंब लागणे अशा परिस्थितीत प्रवाशांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना DGCA ने दिल्या आहेत. विमानाच्या उड्डाणाला विलंब होत असल्यास एअरलाईन्सने प्रवाशांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात असं DGCA ने म्हटलं आहे. DGCA ने दिलेले सर्व नियम हे एअरलाईन्स कंपन्यांना बंधनकारक असणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

plane
Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचं दर्शन घ्यायचंय? फक्त ३० मिनीटांत होणार अयोध्येचा प्रवास, कसं? ते वाचा सविस्तर

काही दिसवांपूर्वी दिल्ली सारख्या शहरात धुक्यांमुळे किंवा वातावरणीय परिस्थितीमुळे विमानाचे उड्डाण रद्द किंवा उशिरा कार्यरत कराव्या लागत होत्या. विमान उड्डाण विलंब आणि रद्द होण्यावरून विमान प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.

आता विमान प्रवाशांना नव्या नियमाची माहिती तिकीटावर द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर विमानाच्या उड्डाणाची सद्यस्थितीची अचूक माहिती आपल्या वेबसाईटवर द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना एसएमएस, ईमेल द्वारे माहिती द्यावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com