Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचं दर्शन घ्यायचंय? फक्त ३० मिनीटांत होणार अयोध्येचा प्रवास, कसं? ते वाचा सविस्तर

Ramlala Darshan : अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळ येतोय. सर्वच भक्तगणांना सोहळ्याची ओढ लागली आहे. जर तुम्हाला अयोध्येला जायचं असेल, तर काळजी करण्याचं कारण नाही. तुमचा हा प्रवास फक्त ३० मिनीटांत पूर्ण होवू शकतो, कसं ते आपण सविस्तर जाणून घेवू या.
Ramlala Darshan Flight
Ramlala Darshan FlightSaam Tv
Published On

Ayodhya Ramlala Darshan By Helicopter

२२ जानेवारी जवळ येत आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह देखील तितक्याच वेगाने वाढत आहे. भाविकांसाठी लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्याच्या मदतीने ३० मिनिटांत अयोध्येला (Ayodhya) पोहोचता येईल. मात्र, यासाठी काही नियमांचं देखील पालन करावं लागणार आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेवून या. (latest ram mandir update)

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी (Ramlala Darshan) उद्योग आणि विमान वाहतूक क्षेत्रात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. आजपासून मुंबईहून अयोध्येसाठी (Ram Mandir) विमानसेवा सुरू होणार आहे. म्हणजेच आता भाविकांना मुंबई ते थेट अयोध्येचा प्रवास पूर्ण करता येणार आहे. लखनौहून अयोध्येला जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांसाठीही हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचीही तयारी सुरू आहे. त्यासाठी १९ जानेवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सेवेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये ८ ते १८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणार आहे. हा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना प्री-बुकिंग करावं लागेल, असं कंपनीचे म्हणणं आहे. कंपनीने १६ जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत भाडे आणि बुकिंग वेळापत्रकाची माहिती देण्यास सांगितलं आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर लखनौ ते अयोध्या (Ayodhya) हे अंतर ३० ते ४० मिनिटांत कापता येणार आहे. सुरुवातीला ६ हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आलीय.

उड्डाणे महागले

क्लब वन एअरने तीन फाल्कन 2000 12-सीटर बिझनेस जेट बुक केले आहेत. चार्टर्ससाठी जेटसेटगोच्या सीईओ कनिका टेकरीवाल यांनी सांगितलं की, अयोध्येत चार्टर फ्लाइटच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि नागपूरसह विविध शहरांतील २५ चौकशींचा समावेश (Ram Mandir) आहे.

Ramlala Darshan Flight
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर उभारण्यासाठी तुरुंगवास भोगणा-या रियल हिरोंना निमंत्रणच नाही, कशाला हवेत सेलिब्रिटी? : कारसेवक

विमानतळावर उड्डाण करणं आव्हानात्मक

जेटसेटगोचे टेकरीवाल म्हणाले की, भाड्याने घेतलेल्या विमानाचे भाडे आकारानुसार १० लाख ते २० लाख रुपयांपर्यंत असते. धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे अयोध्या विमानतळावर उड्डाण करणं आव्हानात्मक असू शकतं. परंतु, चार्टर आणि एअर अॅम्ब्युलन्स ऑपरेटर एमएबी एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे म्हणाले की, त्यांना परवानग्यांबाबत काही स्पष्टता आवश्यक आहे. यावर काम केलं जात आहे. अयोध्या विमानतळ (Ayodhya) दरवर्षी १० लाख प्रवाशांसाठी बांधण्यात आलं होतं. परंतु, आता ते दिवसातून केवळ सहा तास खुले आहे. विमानतळाचे संचालक कुमार म्हणाले की, मंदिराच्या उद्घाटनाच्या (Ram Mandir) वेळी ते आवश्यकतेनुसार १२ तास किंवा २४ तास खुले ठेवण्यात येईल.

Ramlala Darshan Flight
Ayodhya Ram Mandir Invitation: सचिन तेंडुलकरला मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी जाणार अयोध्येला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com