Ayodhya Ram Mandir: राम मंदिर उभारण्यासाठी तुरुंगवास भोगणा-या रियल हिरोंना निमंत्रणच नाही, कशाला हवेत सेलिब्रिटी? : कारसेवक

आपल्याला निमंत्रण मिळालं नसलं तरी स्वखर्चाने कार सेवकांनी आयोध्येत जाण्याची भावना व्यक्त केली आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Saam Tv
Published On

Dhule News :

अयोध्येत राम मंदिर (ayodhya ram mandir) व्हावे यासाठी अंगावर लाठ्या काठ्या झेलत जेल यातना भोगणाऱ्या कारसेवकांना (kar sevak) कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने, कुटुंबीयांनी अयोध्या मंदिरासाठी लढा देणाऱ्या रियल हिरोंना सोडून, खोटा नकाब चढवलेल्या सेलिब्रिटींना सोहळ्याचे निमंत्रण दिले जात असल्याची खंत साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

अयोध्येत राम मंदिराचा सोहळ्याची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या सोहळ्यासाठी दिग्गजांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आल्या आहेत, परंतु या मंदिरासाठी लढा देणाऱ्या कार सेवकांनाच निमंत्रण मिळालं नसल्यामुळे धुळ्यातील कार कारसेवक नाराज झाले आहेत. आपल्याला निमंत्रण मिळालं नसलं तरी स्वखर्चाने आयोध्येत जाण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Ayodhya Ram Mandir
Makar Sankranti 2024: जखमी पक्षांसाठी 'सहयोग' पक्षी चिकित्सालय, पतंगोत्सवात नायलाॅन मांजा वापरु नका; नंदुरबारवासियांना आवाहन

अयोध्या येथे राम मंदिर व्हावे यासाठी सुरू असलेल्या लढ्यात अंगावरती लाठ्या काठ्या झेलत अयोध्येमध्ये धुळ्यातील (dhule) कारसेवक चंद्रकांत शेळके यांनी कुटुंबाची पर्वा न करता, भगवान श्रीराम यांचे मंदिर अयोध्यात व्हावे यासाठी कारावास देखील भोगला आहे. शेळके यांनी तब्बल 15 दिवसांचा कारावास अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी भोगला.

या लढ्यादरम्यान जीवाची परवा न करता अयोध्या राम मंदिराच्या लढ्यात सहभागी झालेल्या या कारसेवकालाच अयोध्यातील राम मंदिराच्या स्थापनेच्या सोहळ्याचे निमंत्रण दिलं नसल्यामुळे चंद्रकांत शेळके यांच्या कुटुंबीयांनी देखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

Ayodhya Ram Mandir
Kite Festival In Nandurbar: रंगीबेरंगी पंतगांनी नंदुरबारची बाजारपेठ सजली, तीन दिवस महाेत्सवाची धूम; युवा वर्गात दांडगा उत्साह

अयोध्येच्या मंदिराच्या लढादरम्यान आयोध्येत धुळ्यातून गेलेल्या चंद्रकांत शेळके यांच्या पत्नीच्या आई-वडिलांनी चंद्रकांत शेळके आता पुन्हा परत येणार नाही, त्याचा विषय सोड, असं म्हणत त्यांच्या कपाळावरील कुंकू देखील पुसलं, परंतु आपले राम घरी परततील असा विश्वास मनात ठेवत चंद्रकांत शेळके या कार सेवकाच्या पत्नीने चंद्रकांत घरी पोहोचण्याची माता सीता प्रमाणे बघितली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अयोध्यातील लढ्यात तब्बल पंधरा दिवसांच्या जेलवारीनंतर चंद्रकांत शेळके आपल्या घरी देखील पोहोचले होते. आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण लढा आपल्या पतीने अयोध्येतील मंदिरासाठी दिल्यानंतर आज जेव्हा अयोध्या मध्ये राम मंदिर उभारले जात आहे, त्या राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ज्यांचा या लढ्यामध्ये कुठलाही सहभाग नाही, अशा सेलिब्रिटींना निमंत्रण दिले जात आहे, परंतु अयोध्येच्या राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या खऱ्या रियल हिरोंना निमंत्रण का नाही, असा संतप्त प्रश्न देखील कार सेवकाच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. यावेळी कार सेवकाच्या पत्नीने साम टीव्हीशी बाेलताना आपली खंत व्यक्त करताना अश्रुंना वाट माेकळी करुन दिली.

Edited By : Siddharth Latkar

Ayodhya Ram Mandir
केळीची लागवड करून कमवा बक्कळ पैसा, वाचा मावळातील प्रयाेगशील शेतकरी बाळासाहेब राक्षेंची Success Story

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com