केळीची लागवड करून कमवा बक्कळ पैसा, वाचा मावळातील प्रयाेगशील शेतकरी बाळासाहेब राक्षेंची Success Story

राक्षे हे शेतात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
success story of maval farmer babasaheb rakhse earns from banana crop
success story of maval farmer babasaheb rakhse earns from banana cropsaam tv
Published On

Maval News :

इंद्रायणी भाताचे (indrayani rice) माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या मावळात (maval) आता भात शेती सोबतच वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग आपल्या शेतात करताना दिसत आहे. साळुंब्रे येथील प्रयोगशील शेतकरी बाबासाहेब राक्षे (farmer balasaheb rakshe) यांनी देशी केळीचे पीक (banana crop) घेण्याचा नवीन प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. (Maharashtra News)

राक्षे यांनी एक एकर क्षेत्र निवडून वाफे करून मागील वर्षी डिसेंबर मध्ये बंगळुरू वरून आणलेले जवाहर देशी वाणाची 550 रोपे त्यांनी लागवड केली. अंतर्गत मशागत करून त्याचप्रमाणे कोंबडी खत आणि शेण खताचा वापर केला.

success story of maval farmer babasaheb rakhse earns from banana crop
Talegaon Dabhade Water Supply : तळेगांव दाभाडेतील पाणीपुरवठा सुरळीत; मुख्याधिका-यांचा दावा, नागरिक संतप्त

दरम्यान रोगाची चिन्हे दिसायला लागताच फवारणी केली गेली. त्यामुळे रोगांचे निर्मुलन होण्यासाठी मदत झाली. त्यामुळे रोपांचे आरोग्य चांगले राहिले. सध्या प्रत्येक झाडाला केळीचे मोठे घड आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फळांचा आकारही सामान्य फळापेक्षा मोठा आणि जाड आहे. या वाणाची उंची 6 ते 8 फूट उंच वाढतात त्यामुळे वादळाचा किंवा वातावरण बदलाचा त्रास होत नाही तसेच उत्पन्नावर परिणाम होत नाही असे राक्षे यांनी नमूद केले.

success story of maval farmer babasaheb rakhse earns from banana crop
Pandharpur News : पंढरपूरकरांना मोठा दिलासा, प्रस्तावित कर वाढ स्थगित

झाडांची पाने विकून देखील कमवा पैसे

सध्या एक घड 30 ते 50 किलोपर्यंत आहे. हा प्रयोग मावळात नवीन असला तरी यशस्वी होत आहे. या वाणाचे क्षेत्र शेतकऱ्यांनी वाढवले पाहिजे. या झाडांची पाने विकून देखील महिन्याला 5 ते 6 हजार रुपये उत्पन्न मिळते. तसेच एकदा लागवड केल्याने पुढील 3 ते 4 वर्ष नफा मिळवता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा प्रयोग करण्याचे आवाहन शेतकरी बाबासाहेब राक्षे आणि शांताराम राक्षे यांनी साम टीव्हीशी बाेलताना केले.

Edited By : Siddharth Latkar

success story of maval farmer babasaheb rakhse earns from banana crop
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीवर सरकारने तोडगा काढा, अन्यथा...; बच्चू कडूंचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com