Pandharpur News : पंढरपूरकरांना मोठा दिलासा, प्रस्तावित कर वाढ स्थगित

स्थानिकांच्या प्रयत्नांना मिळाले यश.
Pandharpur
Pandharpursaam tv
Published On

Pandharpur Nagar Palika News :

पंढरपूर नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या कर वाढीला नगर विकास विभागाने अंतरिम स्थगिती दिली आहे. शासनाच्या या आदेशामुळे पंढरपूर वासियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Maharashtra News)

अलीकडेच पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करात मोठी वाढ प्रस्तावित केली होती. या कर वाढीला पंढरपूर शहरातील नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (maharashtra navnirman sena) विरोध केला होता. नगरपालिकेच्या या प्रस्तावित कर वाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे (dilip dhotre) यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आला होता.

Pandharpur
Maratha Reservation: पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा समाजाची मन की बात कधी ऐकणार? मराठा क्रांती माेर्चा

त्यानंतर धोत्रे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji sawant) यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची भेट घेऊन प्रस्तावित मालमत्ता कर वाढ रद्द करावी अशी मागणी केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगर विकास विभागाने प्रस्तावित कर वाढीला अंतरिम स्थगिती आदेश दिला आहे. शासनाच्या या आदेशामुळे पंढरपूर वासियांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Pandharpur
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीवर सरकारने तोडगा काढा, अन्यथा...; बच्चू कडूंचा सरकारला इशारा (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com