- दिलीप कांबळे / सचिन जाधव
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे (talegaon dabhade) येथील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत हाेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येत्या काही दिवसांत संपूर्ण तळेगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे पालिकेने नागरिकांना आश्वासित केले आहे. दुसरीकडे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणापैकी टेमघर धरणातून temghar dam अद्याप पाणी गळती सुरूच असल्याची माहिती विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिली. (Maharashtra News)
तळेगाव दाभाडे येथील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत. यासाठी अनेकदा स्थानिक नागरिकांकडून तळेगाव नगरपरिषदेवर मोर्चे देखील काढण्यात आले.
त्याचप्रमाणे तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या बदलीची मागणी देखील करण्यात आली. परंतु तळेगाव दाभाडे येथील पाणीपुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.
तळेगावचा पाणीप्रश्न जटील नसून काही ठिकाणी पाईपलाईन गळती सुरू असून ती गळती बंद करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न जात असल्याचे मुख्याधिकारी एन. के पाटील यांनी स्पष्ट केले.
येत्या काही दिवसांत संपूर्ण तळेगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होऊन नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे पाणी पुरवठा पूर्ववत झालाय पण तो वेळेवर नसल्याने तळेगांवकर पाणीपुरवठा व्यवस्थेवर नाराज असल्याचं चित्र दिसून आलंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला काम न देता स्वतः ही जबाबदारी उचलून कर्मचारी यांच्यावर सोपवावी जेणेकरून विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची आशा नागरिकांनी व्यक्त केलीये.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणापैकी टेमघर धरणातून पाणी गळती सुरूच
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणापैकी टेमघर धरणातून (temghar dam) पाणी गळती सुरूच आहे. दुरुस्तीनंतरही टेमघर धरणातून पाणीगळती सुरूच राहिली आहे. प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर गळतीच्या प्रमाणात ९३ टक्के घट झाली मात्र अद्यापही १९७ लीटर प्रतिसेकंद धरणातून पाणीगळती होत असल्याचं समोर आले आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात माहिती दिली. पाणीगळती १०० टक्के बंद होण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.