Tuljabhavani Temple Fake Website : तुळजाभवानीचे बनावट अ‍ॅप अन् वेबसाईट उघडकीस, भक्तांची लूट; एकावर गुन्हा दाखल

वेबसाईटवर देवीची प्रतिमा व लोगो देखील विना परवाना वापरुन मंदिर संस्थानची फसवणूक करण्यात आली आहे.
tuljapur police arrests youth in fake app and website case of tuljabhavani devi sml80
tuljapur police arrests youth in fake app and website case of tuljabhavani devi sml80saam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Tuljapur News :

तुळजाभवानी मंदीर संस्थानची कसलीही परवानगी न घेता देवीच्या नावाशी साधर्म्य असलेले अ‍ॅप आणि वेबसाईट तयार करुन भाविकांची लूट सुरु आहे. या प्रकरणी पाेलीसांनी एका विराेधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पाेलीस कसून चाैकशी करीत आहेत. (Maharashtra News)

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तुळजापुर येथील विजय सुनील बोदले याने तुळजापूर मंदिर संस्थानची परवानगी न घेता तुळजाभवानी देवीच्या नावाशी साधर्म्य असलेले अ‍ॅप्लिकेशन बनविले. तसेच वेबसाईट ही तयार केली. या माध्यमातून तो भाविकांशी संपर्क करून वेगवेगळ्या पुजेसाठी पैसे गोळा करीत असे.

tuljapur police arrests youth in fake app and website case of tuljabhavani devi sml80
Pandharpur Milk Price Protest: रास्ता राेकाे आंदाेलन; दूध दरवाढीसाठी पंढरपूरसह माळशिरसचे शेतकरी आक्रमक

त्याने वेबसाईटवर देवीची प्रतिमा व लोगो देखील विना परवाना वापरुन मंदिर संस्थानची फसवणूक केली आहे. ही बाब मंदिर संस्थानच्या निदर्शनास आली. याबाबत मंदिर संस्थानने पाेलीसांत तक्रार केली. या तक्रारीवरून तुळजापूर पोलीसांनी विजय सुनील बाेदले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

tuljapur police arrests youth in fake app and website case of tuljabhavani devi sml80
कुत्र्यांनी राेखला Bank Of Maharashtra चा दराेडा, घटनेची गावात माेठी चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com