Kim Kardashian Mumbai Auto Rickshaw Saam TV
मनोरंजन बातम्या

Kim Kardashian Mumbai Auto Rickshaw : अनंत अंबानींच्या लग्नाला आलेल्या पाहुणीचा अजब हट्ट; किम कार्दशियनच्या मागणीमुळे प्रशासनाची तारांबळ

Anant Ambani Radhika Merchant Wedding : हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन मुंबईच्या लाईफलाईन पैकी एक असलेल्या ऑटोरिक्षाच्या प्रेमात पडली आहे. किमला ऑटोरिक्षासोबत फोटोशूट करायचं आहे.

Chetan Bodke

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित राधिका- अनंत यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या लग्नासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि राज्यातील काही महत्वाचे राजकीय मंडळीही यावेळी उपस्थित राहणार आहे. अशातच सध्या राधिका- अनंत यांच्या लग्नामुळे एक हॉलिवूड अभिनेत्री चर्चेत आली आहे. ही हॉलिवूड अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून किम कार्दशियन आहे.

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन मुंबईच्या लाईफलाईन पैकी एक असलेल्या ऑटोरिक्षाच्या प्रेमात पडली आहे. किमला ऑटोरिक्षासोबत फोटोशूट करायचं आहे. तिला हे फोटोशूट लालबागच्या मसाला मार्केटमध्ये, सिद्धिविनायक मंदिराजवळ आणि ताज हॉटेलच्या परिसरामध्ये तिला हे फोटोशूट करायचे आहे. खरंतर, ऑटोरिक्षाला दक्षिण मुंबई परिसरामध्ये परवानगी नाही. त्यामुळे प्रॉडक्शन हाऊसची चांगलीच तारांबळ उडाली आहे. परवानगी देण्यावरून परिवहन आणि वाहतूक विभागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे.

जागतिक किर्तीची हॉलिवूड स्टार किम कार्दशियन सध्या अनंत- राधिकाच्या लग्नासाठी भारतात आली आहे. याचेच निमित्त साधून तिला दक्षिण मुंबईमध्ये हटके फोटोशूट करायचं आहे. ताज परिसरातील फोटोशूटसाठी तिला ऑटोरिक्षा हवी आहे; परंतु दक्षिण मुंबईत ऑटोरिक्षा चालविण्यास परवानगी नसल्याने फोटोशूट अडचणीत आले आहे. येत्या १३ जुलै रोजी किमचे फोटोशूट होण्याची शक्यता आहे. मात्र आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही, असं वाहतूक सहआयुक्तांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT