Mumbai News: भाडे नाकारणाऱ्या ऑटोरिक्षा - टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, 654 परवाने केले निलंबित

Mumbai Traffic Police: गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, जादा भाडे मागणाऱ्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Rikshaw and Taxi
Rikshaw and Taxisaam tv
Published On

Mumbai Traffic Police:

गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, जादा भाडे मागणाऱ्या ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरुद्ध आतापर्यंत 1650 तक्रारी प्राप्त झाल्या असून 654 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.''

मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर 11 जुलै 2023 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत 1650 तक्रारी वाहतूक पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कार्यालयाशी निगडित 717 तक्रारी आहेत. त्यापैकी 604 तक्रारी या ऑटोरिक्षा व 113 तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधीत आहेत. तक्रारींमध्ये 540 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, 52 तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे व 125 तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करण्याबाबत प्राप्त झाल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rikshaw and Taxi
Raigad Politics: तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंनी ठोकला शड्डू, डबल गद्दारी झालेल्यांना मातीत गाडायचंय, ठाकरेंनी बांधला चंग!

त्याचप्रमाणे 717 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. दोषी आढळलेल्या एकूण 654 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यापैकी 503 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 58 वाहनधारकांकडून 1 लाख 45 हजार 500 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहेत. तसेच 105 परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, 46 परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या पेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण 82 प्रकरणात 2 लाख 4 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.  (Latest Marathi News)

तसेच 31 तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच सद्यस्थितीत परवाना निलंबित करण्यात आलेल्या 572 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ‘नॉट टू बी ट्रान्सक्टेड’ नोंद (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. कारवाईच्या माहितीबाबत तक्रारदारांना व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर या माध्यमांतून अवगत करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Rikshaw and Taxi
Sane Guruji Memorial: साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी उपलब्ध करून दिला जाईल: उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाशांनी आश्वस्त रहावे. परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन या वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. यातच खोटी तक्रार दाखल करणे हा भारतीय दंड विधान कलम 192, 193, 199 व 200 अंतर्गत दंडनीय गुन्हा असून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे याविरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. त्यासाठी 9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ई-मेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com