Uddhav Thackeray Konkan Visit
Uddhav Thackeray Konkan VisitSaam Tv

Raigad Politics: तटकरेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंनी ठोकला शड्डू, डबल गद्दारी झालेल्यांना मातीत गाडायचंय, ठाकरेंनी बांधला चंग!

Uddhav Thackeray Konkan Visit: उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यात लोकसभा निवडणुकी दरम्यान समिकरण बदलाचे संकेत दिले आहेत.
Published on

>> सचिन कदम 

Raigad Politics:

उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यात लोकसभा निवडणुकी दरम्यान समिकरण बदलाचे संकेत दिले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्या ठाकरेंच्या सभेला मुस्लिम मतदारांची वाढती संख्या चर्चेचा विषय बनली असून मुस्लिम मतांवर गणित मांडणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी शड्डू ठोकून महायुतीला अव्हान दिले आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली असताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगडमध्ये निवडणुकपूर्व दौरा काढून रायगडमधील राजकारण ढवळून काढले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray Konkan Visit
Sane Guruji Memorial: साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी उपलब्ध करून दिला जाईल: उपमुख्यमंत्री अजित पवार

गद्दारांना मातीत गाडायचंय, असा चंग ठाकरेंनी बांधला आहे. घराणेशाहीच्या मोदींच्या मुद्द्याला हात घालत ठाकरे यांनी थेट खासदार सुनिल तटकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. स्वतः तटकरे खासदार, मुलगी मंत्री आणि मुलगा आमदार याचा उल्लेख करीत मोदींनी घराणेशाही संपवावी, असे अवाहन ठाकरे यांनी रायगडमधील सभा दरम्यान केले आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे की भाजपचे धर्यशील पाटील यांच्या नावावर अद्याप एकमत झालेले दिसून येत नाही. तर ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी अनंत गीतेंच्या नावाची निश्चिती करण्यात आली आहे. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये कुणबी मतांचा टक्का अधिक असल्याने अनंत गीतेंना त्याचा होणार फायदा होऊ शकतो.

Uddhav Thackeray Konkan Visit
America आणि Britain मध्ये शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी! भारतीय विद्यार्थ्यांना मिळत आहे 82 लाखांची शिष्यवृत्ती; असा करा अर्ज

तसेच रायगडमधील मुस्लीम मतांवर ठाकरेंचा आता डोळा असून दोन दिवसांच्या रायगड दौऱ्यात मुस्लिम मतदारांची वाढती संख्या दिसून येत आहे. मराठी मुस्लीम संघटनेचे पदाधिकारी ठाकरेंच्या व्यासपीठावर दिसत आहेत. भाजपशी युती केल्याने तटकरे यांच्यापासून मुस्लिम मत दुरावण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाकरे यांनी मुस्लिम मतांना हात घातल्याचे या दौऱ्या दरम्यान दिसून आलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com