Siddhivinayak Temple Trust Gets BMC Notice: मुंबई महानगरपालिकेने (BMC) सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला नोटीस बजावली आहे. पालिकेच्या जी उत्तर प्रभाग कार्यालयाने ही नोटीस बजावल्याचे समजतं आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली असल्याचं समजतं आहे.
पालिकेच्या नोटीसनुसार, मंदिर ट्रस्टने ट्रस्ट कार्यालयाच्या तळमजल्यावर खाद्यतेल आणि तूप साठवले आहे. इमारतीची डागडुजी सुरू असून, त्यासाठी तात्पुरता लोखंडी जिना बांधण्यात आला आहे. (Latest Marathi News)
पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्वलनशील पदार्थामुळे आग लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी इमारतीचा खराब झालेला भाग कोसळू शकतो. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्याची सूचना केली आहे.
ट्रस्टला तळमजल्यावरील सर्व ज्वलनशील साहित्य काढून टाकण्यास सांगितले आहे. नोंदणीकृत स्ट्रक्चरल ऑडिटरकडून दुरुस्ती करून घेण्याचे आदेशही पालिकेने ट्रस्टला दिले आहेत.
पालिकेच्या जी उत्तर प्रभागाने गेल्या महिन्यात ही नोटीस जारी केली होती. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला या समस्येबद्दल तक्रार मिळाली म्हणून आमच्या टीमने घटनास्थळी भेट दिली.
सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त माजी महापौर विशाखा राऊत म्हणाल्या, “आम्ही प्रभाग कार्यालयात खुलासा सादर केला आहे. लाडू तयार करण्यासाठी आमच्याकडे पालिका आरोग्य विभाग आणि मुंबई अग्निशमन दलाची परवानगी आहे. अग्निसुरक्षेबाबतही आम्ही चिंतित आहोत. दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.