Wrestlers Protest Latest News In Marathi: कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshee Malikkh) माघार घेतल्याच्या बातम्या माध्यमांत झळकल्यानंतर आता साक्षी मलिकने या बातम्या चुकीच्या असल्याचं म्हटलं आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने पुन्हा रेल्वेत नोकरी जॉईन केली असा दावा एएनआय या वृत्तसंस्थेने सोमवारी दावा केला होता. मात्र हा दावा समोर आल्यानंतर काही वेळातच साक्षी मलिकने तो खोटा असल्याचे म्हटले आहे.
साक्षीने ट्वीट करून म्हटले की, ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. न्यायाच्या लढाईत आणच्यापैकी कोणीही मागे हटले नाही आणि हटणारही नाही. सत्याग्रहासोबतच मी रेल्वेतील जबाबदारीही पार पाडत राहणार आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. कृपया कोणतीही चुकीची बातमी पसरवू नका, असे आवाहन तिने माध्यमांना केले आहे.
यानंतर एएनआयने आणखी एक ट्वीट करत साक्षी मलिकसोबत संभाषणाचा ऑडिओ पोस्ट केला आहे. यात साक्षीने म्हटले की, "आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो, ती सामान्य चर्चा होती. आमची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे त्यांना (ब्रिजभूषण सिंग) अटक करा. मी आंदोलनातून मागे हटले नाही, मी रेल्वेमध्ये ओएसडी म्हणून माझे काम पुन्हा सुरू केले आहे. मला स्पष्ट करायचे आहे की आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. आम्ही मागे हटणार नाही. तिने (अल्पवयीन मुलीने) एकही एफआयआर परत घेतलेला नाही, हे सर्व खोटे आहे" असे कुस्तीपटू साक्षी मलिकने एएनआयशी बोलताना म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं केलं आहे. ब्रिजभूषण सिंग यांच्यावर तातडीने कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी महिला कुस्तीपटूंकडून करण्यात येत आहे.
दरम्यान आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने स्वतःला आंदोलनातून दूर केल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. तसेच साक्षी मलिक आपल्या रेल्वेतील नोकरीवरही परतल्याचे या वृत्तात म्हटले होते. पंरतु, साक्षीने आपण आंदोलनातून माघार घेतली नसून आंदोलनासोबतच रेल्वेतील कर्तव्य बजावत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Political News)
कुस्तीपटूंची टोकाची भूमिका
गेल्या आठवड्यात महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ आपली पदके गंगेत वाहण्याचा निर्णय घेतला होता. ही पदकं देशासाठी पवित्र आहे. त्यामुळे ते पवित्र गंगेतच टाकावे असे त्यांनी म्हटले होते. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे पदक गंगेत फेकण्यासाठी हरिद्वारला पोहोचलेही होते. पंरतु टिकैत यांनी मध्यस्थी केल्यानंतर कुस्तीपटू गंगाकाठाहून माघारी परतले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.