kedar shinde SAAM TV
मनोरंजन बातम्या

kedar shinde : ...तर मी शून्य, केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

kedar Shinde Womens Day Post : केदार शिंदेंनी 'जागतिक महिला' दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. नेमकं ते पोस्टमध्ये काय म्हणाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आज (8 मार्च) 'जागतिक महिला दिन' सर्वत्र साजरा केला जात आहे. हा दिवस महिलांना गौरवण्याचा, त्यांचे कौतुक करण्याचा आणि त्यांच्या यशाची वाट मोकळी करून देण्याचा आहे. आज महिलांनी खूप प्रगती केली आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिला वर्ग आघाडीवर आहे. आजची महिला कोणतेही काम सहजरित्या पूर्ण करू शकते. मग ते घर चालवणे असो किंवा नोकरी करणे. अभिनय क्षेत्रातही महिला आघाडीवर पाहायला मिळत आहे. "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते" हे वाक्य आपण कायम ऐकत आलो आहोत. संदर्भात दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी खास पोस्ट केली आहे.

केदार शिंदे यांनी आजवर खूप हटके चित्रपट केले आहेत. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतीच केदार शिंदे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील दोन खास व्यक्तींसाठी प्रेम आणि त्यांचे आयुष्यातील महत्त्व व्यक्त केले आहे. केदार शिंदे यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

केदार शिंदे पोस्ट

"आज जागतिक महिला दिन. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात 'स्त्री' ही अविभाज्य घटक असते, कारण जन्म देणारीच एक स्त्री असते. पुढे आयुष्यात अनेक स्त्रिया आपल्या आयुष्यात येतात. आईपासून सुरूवात जरी झाली तरी, मावशी आत्या आजी काकू...ते शाळा कॅालेजात शिक्षिका... पण पुन्हा एक वळण येतं जेव्हा लग्न होतं.

बेलाचे माझ्या आयुष्यात येणे हा टर्निंग पॉइंट होता. मी एकांकिका स्पर्धेत धडपडणारा. अचानक संसाराची जबाबदारी अंगावर पडल्यावर, हातपाय मारू लागलो. माझ्या नाटक सिरीयल सिनेमाच्या प्रवासात अनेक चढउतार आले. येतायत, येतील... खंबीरपणे साथ देणारी 'ती' माझ्यासोबत आहे!

त्यानंतर मुलीच्या रूपात आयुष्यात आली 'ती' सना शिंदे... तिने जबाबदारी सोबतच मॅच्युअर बनवले. आज माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणजे सना... आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात अपग्रेट रहाण्याचा मार्ग म्हणजे सना. या दोघी नसतील तर मी शून्य आहे. मी ३६५ दिवस त्यामुळेच महिला दिन साजरा करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : लांब आणि जाड केसांसाठी जादुई नुस्खा, फक्त वापरा या घरगुती गोष्टी

Jaipur Accident: हायवेवर रात्री भयानक अपघात! भरधाव कारने १६ जणांना उडवले, अन्...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधी? एरियर किती मिळणार? वाचा कॅल्क्युलेक्शन

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT