Success Story: सिनेमात अभिनय, कॉलेजमध्ये गोल्ड मेडल; नंतर कोचिंग क्लासेसशिवाय UPSC क्रॅक, वाचा IPS सिमाला प्रसाद यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story IPS Simala Prasad: आयपीएस सिमाला प्रसाद यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केले आहे.
Success Story
Success StorySaam tv
Published On

मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणताही व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. असंच यश आयपीएस सिमाला प्रसाद यांनी मिळवलं आहे. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या अभ्यासात तर हुशार होत्या. त्याचसोबत त्यांनी अभिनयक्षेत्रातही काम केले आहे. (Success Story)

Success Story
Success Story: आईला गंभीर आजार; सलग ५ वेळा अपयश; ६ व्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS प्रियंका गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास

आयपीएस सिमाला प्रसाद या मूळच्या मध्य प्रदेशमधील भोपाळच्या रहिवासी. त्यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९८० रोजी झाला. त्यांचे वडील डॉ. भागीरथ प्रसाद हेजेखील आयएएस ऑफिसर होते. त्यांची आई मेहरुन्निसा परवेज यादेखील साहित्यकार होत्या. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांनीदेखील वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले. (Success Story Of IPS Simala Prasad)

सिमाला प्रसाद यांनी सुरुवातीला सेंट जोसेफ कोएड स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यानंतर इन्स्टिट्यूट फॉर एक्सीलेंस इन हाय एज्युकेशनमधून बीकॉम केले. त्यानंतर भोपाळ येथून समाजशास्त्र विषयात ग्रॅज्युएशन केले. त्यांनी युनिव्हर्सिटी परीक्षेत टॉप करत गोल्ड मेडल मिळवले होते.

कॉलेज झाल्यावर त्यांनी मध्य प्रदेशच्या लोक सेवा आयोगाची एमपी पीएससी परीक्षा पास केली. त्यांनी पहिली पोस्टिंग डिएसपी म्हणून झाली.सरकारी नोकरी करत असताना त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय ही परीक्षा क्रॅक केली. त्या २०१० मध्ये बॅच अधिकारी झाल्या.

Success Story
Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, ४८ लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS अंजली विश्वकर्मा यांचा प्रवास

आयपीएस सिमाला प्रसाद या देशातील सर्वात सुंदर महिला आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. त्यांना लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची आवड होती. त्यांनी शाळेत असताना नाटकात काम केले. त्यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अभ्यासात आणि चित्रपटांमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले.

Success Story
Success story: कोशिश करने वालों की...! देविदास पाटलांची यशोगाथा वाचून तुम्ही कधीच हार मानणार नाही!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com