Kedar Shinde Post: तुम्ही अजूनही आहात..., आजोबा शाहीर साबळेंच्या स्मृतिदिनानिमित्त केदार शिंदे यांची भावुक पोस्ट

Kedar Shinde Post On Shahir Sabale: केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजोबा शाहीर साबळे यांचा फोटो शेअर केला आहे. शाहीर साबळे यांचा आज स्मृतिदिन आहे त्यानिमित्ताने त्यांनी ही पोस्ट केली आहे.
Kedar Shinde Post On Shahir Sabale
Kedar Shinde Post On Shahir SabaleSaam Tv
Published On

Shahir Sabale Death Anniversary:

मराठमोळे अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचे मराठी सिनेसृष्टीत मोठे योगदान आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळते. केदार शिंदे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. आयुष्यातील घडामोडी, नवीन प्रोजेक्ट याबाबतची माहिती ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच त्यांनी आपले आजोबा शाहीर साबळे (Shahir Sabale) यांच्यासाठी भावुक पोस्ट लिहिली. शाहीर साबळे यांचा आज स्मृतिदिन आहे त्यानिमित्ताने त्यांनी ही पोस्ट केली आहे.

केदार शिंदे यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजोबा शाहीर साबळे यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बाबा.. शाहीर साबळे.. आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही अजूनही आहात. प्रत्येक माणसाच्या मनात आणि तुमच्या अलौकिक गाण्याने, प्रत्येकाच्या कानात. वर्षानुवर्षे तुम्ही स्मरणात रहाल, कित्येक पिढ्या तुमच्या बद्दल जाणून घेऊ शकतील म्हणून #महाराष्ट्रशाहीर सादर केला. तुम्ही जे कलात्मक संस्कार केलेत त्याची गुरूदक्षिणा...'

केदार शिंदेची ही भावुक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी शाहीर साबळे यांना विनम्र अभिवादन केले आहे. केदार शिंदे यांच्या पोस्टवर वैशाली सामंत, सुकन्या मोने, जयवंत वाडकर, सीमा घोगळे या कलाकारांनी कमेंट्स करत शाहीर साबळे यांना अभिवादन केले आहे.

Kedar Shinde Post On Shahir Sabale
Rakhi Sawant अडचणीत, समीर वानखेडेंनी दाखल केला मानहानीचा खटला; नेमकं प्रकरण काय?

शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा होते. त्यांच्या आईचे ते वडील होते. त्यांचे पूर्ण नाव कृष्णराव गणपतराव साबळे असे होते. पण ते शाहीर साबळे या नावाचे ओळखले जायचे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहीर साबळे घराघरामध्ये पोहचले होते. २० मार्च २०१५ रोजी त्यांचे मुंबीईतल्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले होते. आज त्याचा स्मृतिदिन आहे.

केदार शिंदे यांनी आपले आजोबा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट तयार केला होता. हा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये शाहीर साबळे यांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरीने साकारली आहे. केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Kedar Shinde Post On Shahir Sabale
Alka Yagnik Birthday: एका गाण्यासाठी इतकी फी घेतात अलका याज्ञिक, आज आहेत कोट्यवधीच्या मालकीण; आकडा पाहून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com