Radhika Apte : राधिका आपटेची नवी इनिंग! अ‍ॅक्शन सिनेमाचे करणार दिग्दर्शन, चित्रपटाचे नाव काय?

Radhika Apte Debut As Director : अभिनेत्री राधिका आपटे अभिनयानंतर आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तिच्या चित्रपटाचे नाव जाणून घेऊयात.
Radhika Apte Debut As Director
Radhika Apte SAAM TV
Published On

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. ती बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही काम करते. अलिकडेच राधिका आई झाली आहे. तिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. राधिकाने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

राधिका आपटे नवीन प्रवास

आता लेकीच्या जन्मानंतर राधिका आपटे पुन्हा कामावर परतली आहे. मात्र राधिका आता एका नवीन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणार अभिनेत्री राधिका आपटे आता दिग्दर्शन (Director ) क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ती 'कोट्या' (Kotya) या ॲक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 'कोट्या' चित्रपटाची घोषणा सिनेव्हेश्चर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (CIFF) च्या सिने व्ही सीएचडी मार्केट लाईनअपमध्ये करण्यात आली.

'कोट्या' चित्रपट

'कोट्या' चित्रपटाची निर्मिती विक्रमादित्य मोटवानी करत आहेत. 'कोट्या' हा चित्रपट हिंदी/मराठी असणार आहे. 'कोट्या' हा ॲक्शन-फँटसी सिनेमा असणार आहे. चित्रपटात उसतोड तरुणाची गोष्ट सांगण्यात येणार आहे, ज्याला बळजबरीने केलेल्या एका वैद्यकीय प्रक्रियेनंतर काही शक्ती मिळतात. ज्याचा वापर तो कुटुंबावरील कर्ज उतरवण्यासाठी करतो.

राधिका वैयक्तिक आयुष्य

अभिनेत्री राधिका आपटेने 2012 रोजी बेनेडिक्ट टेलरशी (Benedict Taylor) लग्नगाठ बांधली. बेनेडिक्ट टेलर हा ब्रिटिश व्हायोलिस्ट आहे. लग्नाच्या 12 वर्षांनी बेनेडिक्ट आणि राधिका आईबाबा झाले आहेत. चाहते आता राधिकाच्या 'कोट्या' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Radhika Apte Debut As Director
Nana Patekar : नाना पाटेकरांना कोर्टाचा दिलासा, तनुश्री दत्ताने केला होता 'मी टू'चा आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com