Nana Patekar : नाना पाटेकरांना कोर्टाचा दिलासा, तनुश्री दत्ताने केला होता 'मी टू'चा आरोप

Nana Patekar-Tanushree Dutta Case : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. नेमकं काय घडले जाणून घेऊयात.
Nana Patekar-Tanushree Dutta Case
Nana PatekarSAAM TV
Published On

मराठी दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांनी आजवर अनेक हिट चित्रपट केले आहे. त्यांच्या अभिनयाचे तर प्रेक्षक दिवाने आहेत. नाना पाटेकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अलिकडेच अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. मात्र आता या प्रकरणी नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे. नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी दिलासा मिळाला आहे.

तनुश्री दत्ता हिने केलेली नाना पाटेकर यांच्याविरोधातील तक्रार दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. मात्र लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नसल्यामुळे दंडाधिकारी कोर्टानं तनुश्रीची याचिका फेटाळून लावली आहे.

तनुश्रीने अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रार केली होती. यात तिने विनयभंग तसेच धमकीचा उल्लेख केला होता. कोर्टात वकिल अनिकेत निकम यांनी नाना पाटेकर यांची बाजू मांडली. पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने केलेली तक्रार अखेर रद्द केली.

नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008 मध्ये नाना पाटेकर, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी , निर्माता राकेश सारंग आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता.

या प्रकरणी या चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याची तक्रार तनुश्रीने 2018 मध्ये केली. 'हॉर्न ओके प्लीज' गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी माझा छळ केला होता. गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाना पाटेकर यांनी तनुश्री गैरवर्तन करून स्पर्श केल्याचे म्हटले आहे.

Nana Patekar-Tanushree Dutta Case
Chhaava Box Office Collection: चौथ्या आठवड्यात 'छावा'ची उंच भरारी, राम चरणच्या 'RRR' ला टाकलं मागे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com