Nana Patekar : 'आ गए मेरी मौत का तमाशा...'; कधी लिहिलाच नव्हता नाना पाटेकरांच्या 'क्रांतिवीर' सिनेमातला 'तो' आयकॉनिक सीन

Nana Patekar : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्या 'क्रांतिवीर' चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन चांगलाच गाजला होता. परंतु, नानांचा तो सीन कधीच लिहिला नव्हता हे कळल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटले.
Nana Patekar Krantiveer was never written
Nana Patekar Krantiveer was never writtenGoogle
Published On

Nana Patekar : सुमारे 30 वर्षांपूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते 'क्रांतिवीर'. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन आयकॉनिक ठरला. त्या सीनमध्ये नाना पाटेकर यांनी ज्या पद्धतीने अभिनय केला तो सगळ्यांच्याच मनाला भिडला. पण नानांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. क्रांतीवीर चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन कधीच लिहिला गेला नसून तो त्यांनी स्वतः तयार केलेली सीन असल्याचे नानांनी सांगितले.

'क्रांतीवीर'चा क्लायमॅक्स सीन कसा शूट झाला? याप्रश्नाचे उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले, त्यावेळी मी रुग्णालयात होतो आणि दुसऱ्या दिवशी शूटिंग होणार होते. मी म्हणालो आज मी मेलो तर दुसऱ्या दिवशी निर्माते मरतील. तर चला शूटिंगला जाऊया."

Nana Patekar Krantiveer was never written
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी अक्षय कुमारचे केले कौतुक ; केली हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्याशी तुलना !

नाना पुढे म्हणाले, “निर्मात्यांनीही सांगितले की, मला आधी बरे होऊ द्या, पण मी त्यांना सांगितले की मी शूट करणार नाही. माझ्यासोबत तीन-चार डॉक्टर तिथे गेले. आता जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मी ड्रेस घातला आणि म्हणालो एक सीन दे, मग तो म्हणाला चला लिहू. मी म्हणालो लिहू? याचा अर्थ काय? तेव्हा दिग्दर्शकाने स्पष्ट केले की सीन असा असेल, फक्त संवाद तुम्ही लिहा आणि सादर करा."

Nana Patekar Krantiveer was never written
Nana Patekar : सनी देओलच्या 'गदर ३'मध्ये नाना पाटेकर साकारणार खलनायकाची भूमिका ! वाचा सविस्तर

"त्यानंतर मी म्हणालो, ठीक आहे आता लंच ब्रेक घ्या, आपण 2.30 वाजता शूटिंग सुरू करू. लंच ब्रेकमध्ये काय बोलावे आणि काय करावे याचा विचार केला. नंतर दुपारी अडीच वाजता शूटिंग सुरू होऊन संध्याकाळी ५ वाजता संपले. मी बोलत राहिलो आणि पुढे काय बोलावे असा विचार करत असताना मी जल्लादच्या हातातून कापड काढून तोंड झाकले. नाना पाटेकरांचा हा सीन आजही आयकॉनिक मानला जातो, ज्यामध्ये नानांनी आपली क्रिएटिव्हिटी आणि उत्तम अभिनय शैली दाखवली होती.

बॉक्स ऑफिसवर गाजला क्रांतीवीर

मेहुल कुमार दिग्दर्शित आणि निर्मिती 'क्रांतीवीर' सुपरहिट चित्रपट होता. यामध्ये डिंपल कपाडिया नाना पाटेकरांसोबत दिसली होती. याशिवाय अतुल अग्निहोत्री, ममता कुलकर्णी, परेश रावल, टिनू आनंद आणि डॅनी हे कलाकार या चित्रपटात दिसले होते. 'क्रांतीवीर' चित्रपटाचे बजेट 2 कोटी रुपये होते, तर चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 14.81 कोटी रुपयांचे उत्तम कलेक्शन केले. या चित्रपटाचा त्या वर्षीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com